नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर आश्वासने न पाळल्याचा आरोप करीत संसद परिसरातील धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले़मोदी सरकारने सहा महिन्यांच्या काळात एकाही निवडणूक आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप करीत काँग्रेसने सोमवारी यासंदर्भात ३० पानांची पुस्तिका प्रसिद्ध केली होती़ संसदेसमोरील धरणे आंदोलनापूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या संसदीय मंडळाच्या संसदीय प्रकरणांच्या समितीची बैठक झाली़ धरणे आंदोलनादरम्यान काँगे्रसजनांनी भाजपा व भाजपाप्रणीत रालोआ सरकारवर काळा पैसा आणि घुसखोरीसारख्या अनेक मुद्यांवर घूमजाव केल्याचा आरोप केला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदी सरकारविरुद्ध राहुल यांचे धरणे
By admin | Updated: December 3, 2014 01:46 IST