शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राहुल ५ डिसेंबरला होणार काँग्रेस अध्यक्ष, बिनविरोध निवड होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 06:24 IST

काँग्रेसच्या कार्यसमितीने पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी देत राहुल गांधी हे ५ डिसेंबर रोजी काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील, असे जणू सोमवारी स्पष्टच केले

शीलेश शर्मा नवी दिल्ली : दीर्घ काळापासूनच्या चर्चा व अंदाज यांना पूर्णविराम देत काँग्रेसच्या कार्यसमितीने पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी देत राहुल गांधी हे ५ डिसेंबर रोजी काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील, असे जणू सोमवारी स्पष्टच केले. निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला.त्यानुसार १ डिसेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना निघेल व ४ रोजी अर्ज दाखल करता येईल. अर्जांची यादी ५ रोजी ३.३० वाजता जारी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत ११ डिसेंबर असून, गरज भासल्यास १६ डिसेंबर रोजी मतदान होईल. मतमोजणी १९ डिसेंबर रोजी होईल. प्रत्यक्षात राहुल गांधी यांच्याविरुद्ध अर्ज दाखल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात येईल, असे नेत्यांचे म्हणणे आहे.गुजरात निवडणुकांच्या नावाखाली संसदेचे अधिवेशन बोलाविण्यापासून पळ काढत आहे, अशी टीका सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी बैठकीत केली. गुलाम नबी आझाद, ए. के. अँथनी, जनार्दन द्विवेदी, अशोक गहलोत, अंबिका सोनी, पी. चिदंबरम व अन्य ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. ज्येष्ठ नेते एम. एल. फोतेदार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.>सरकार खोटी माहिती देते - सोनिया गांधीमोदी सरकार इतिहास बदलत आहे, असा आरोप करून सोनिया गांधी म्हणाल्या की, पं. नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कामगिरीला शालेय अभ्यासक्रमातून हटवून पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सरकार खोटी माहिती पसरवून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना बदनाम करीत आहे.सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस कार्यसमितीमध्ये राहुल गांधी यांच्याकडे त्वरित अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवायला हवी, असे सर्व नेत्यांनी एकसुरात सांगितले. मात्र, सोनिया गांधी यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. कुणी निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित करू नये, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी