शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राहुल, प्रियांका गांधी यांना मेरठमध्ये जाण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:13 IST

राज्य सरकारने परत पाठविले; काँग्रेसकडून निषेध

मेरठ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील निदर्शनांमध्ये ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मेरठमध्ये येण्यास उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी मज्जाव केला व त्यांना परत पाठविण्यात आले. काँग्रेस सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी, प्रियांका गांधी व अन्य काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांना पोलिसांनी पारतापूर पोलीस ठाण्यानजिक अडवले. आम्हाला मेरठमध्ये येऊ न देण्याच्या आदेशाची प्रत दाखवा, अशी मागणी करूनही पोलिसांनी प्रत न दाखवता आम्हाला परत पाठवले असे राहुल गांधी यांनी सांगितले. या प्रकाराबाबत उत्तर प्रदेश सरकारवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी टीका केली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे.मेरठमध्ये संचारबंदी आहे.

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या मेरठ भेटीमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास त्यासाठी त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे पोलिसांनी या नेत्यांना सांगितले. त्यावर ते नेते स्वत:हून माघारी परतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिजनौरमध्ये आंदोलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांची प्रियांका गांधी यांनी रविवारी भेट घेतली. उत्तर प्रदेशात आंदोलनादरम्यान आतापर्यंत १७ जण मरण पावले आहेत.

सोनिया गांधी, ओवेसींविरोधात तक्रारनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात भडक वक्तव्ये केल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, एआयएमआयएम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, पत्रकार रवीशकुमार यांच्या विरोधात अ‍ॅड. प्रदीप गुप्ता यांनी उत्तर प्रदेशमधील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी