शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी रणनीतीसाठी राहुल-पवारांची चर्चा, प्रादेशिक पक्षांना जवळ आणण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 06:35 IST

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मतदारांनी दणका दिल्यानंतर भाजपाविरुद्ध आघाडी तयार करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोहीम उघडली असून, त्याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

- शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मतदारांनी दणका दिल्यानंतर भाजपाविरुद्ध आघाडी तयार करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोहीम उघडली असून, त्याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधातील आघाडी मजबूत करण्यासाठी पवारांवर यूपीए (तीन)चे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्याचा विचार आहे.पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीसाठी प्रयत्न सुरू असून, ही भेट त्यासाठीच होती, असे कळते. भाजपाचा गोरखपूर व फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांच्या एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.उत्तर प्रदेश व बिहारमध्ये काँग्रेस पक्ष काही प्रभाव दाखवू शकला नाही. तेथे प्रादेशिक पक्षांनीच भाजपाला पराभूत केले. त्यामुळे सर्व प्रादेशिक पक्षांना या आघाडीत घेणे आवश्यक आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. शरद पवार त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सर्व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाविरुद्ध विरोधकांची संयुक्त आघाडी स्थापन करण्याबाबत विचारविमर्श झाला.>महाराष्ट्रातील राजकारणाचाही उल्लेखमहाराष्ट्रात शिवसेनेने भाजपाचा पाठिंबा काढून घेतल्यास काय स्थिती निर्माण होईल? त्यानंतर होणाºया विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी करण्याचे काय? याबद्दलही चर्चा झाल्याचे काँग्रेस सूत्रांनी सांगितले.तृणमूललाही सोबत घेण्याचे प्रयत्नराहुल गांधी लवकरच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे कळते. शरद पवार यांनीही२८ मार्च रोजी विरोधी नेत्यांची बैठक बोलावली असून, तेथे ममता बॅनर्जी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्या सोनिया गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांनी सोनिया गांधी यांच्या भोजनास आपले प्रतिनिधी पाठवले होते. तेलगू देसम व तेलंगणा राष्ट्र समिती यांनाही संयुक्त आघाडीत आणण्याचे प्रयत्न पवार करणार असल्याचे समजते. या बैठकीच्या एक दिवसापूर्वीच यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भोजनास बोलावले होते. यात १९ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.>काँग्रेसचे आजपासून दिल्लीत अधिवेशनकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या अधिवेशनाला शुक्रवारी दिल्ल्लीमध्ये सुरुवात होत आहे. प्रत्यक्ष खुले अधिवेशन १७ मार्च रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणार असून, उद्या कार्य समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा अजेंडा तयार होणार आहे. या अधिवेशनात काँग्रेसचे तरुण नेतृत्व व कार्यकर्ते यांच्यावरच अधिक लक्ष केंद्रित करण्यात येईल.>कार्यकर्त्यांना बोलण्याची संधीया अधिवेशनात चार महत्त्वाचे प्रस्ताव मांडले जाणार आहेत. त्यावर प्रमुख नेत्यांसह ब्लॉक व जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे. यात बदल करावेत, अशी सूचना केली व ती पक्षाला योग्य वाटली तर तशी कृती लगेच केली जाईल. मोदी सरकारने चार वर्षांत केलेल्या कामगिरीची चिकित्सा करणारी पाच इंग्रजी पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवार