शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं, मग 'हम दो हमारे दो'चा नारा द्यावा'

By महेश गलांडे | Updated: February 16, 2021 22:23 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी हे अविवाहित असल्यामुळे त्यांच्या विवाहाची नेहमीच चर्चा होत असते. देशातील बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या लग्नासंदर्भात अनेकदा जाहीरपणे मतंही व्यक्त होतात.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी हे अविवाहित असल्यामुळे त्यांच्या विवाहाची नेहमीच चर्चा होत असते. देशातील बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या लग्नासंदर्भात अनेकदा जाहीरपणे मतंही व्यक्त होतात.

नवी दिल्ली - आपल्या कविता आणि विधानांमुळे रिपाइचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यावर केलेल्या कवितेमुळे रामदास आठवले चर्चे होते. आता, राहुल गांधींच्या लग्नासंदर्भात आठवलेंनी विधान केले आहे. हम दो हमारे दो... या घोषवाक्याची जनजागृती करण्यासाठी राहुल गांधींनी अगोदर लग्न करावे, असा सल्ला आठवलेंनी दिला आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी हे अविवाहित असल्यामुळे त्यांच्या विवाहाची नेहमीच चर्चा होत असते. देशातील बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या लग्नासंदर्भात अनेकदा जाहीरपणे मतंही व्यक्त होतात. आता, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींच्या लग्नासंदर्भात आणि कुटुंब नियोजनाच्या जनजागृतीबाबत मत व्यक्त केलं आहे. कुटुंब नियोजनासाठी हम दो हमारे दो या घोषवाक्यातून जनजागृती केली जाते. जर, राहुल गांधींना याची जनजागृती करायची असेल तर त्यांनी अगोदर लग्न करायला हवं. विशेष म्हणजे राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करुन महात्मा गांधींचं जातीव्यवस्थेचं मूळ नष्ट करण्याचं स्वप्न पूर्ण करावं, असेही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं.   रामदास आठवलेंनी वाढत्या इंधन दरवाढीवरही भाष्य केलं. सरकारने नुकताच 34 लाख कोटींपेक्षा अधिकचा अर्थसंकल्प मांडला आहे. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली असून सरकारकडेही कराच्या माध्यमातून पैसा यायला हवा. मात्र, पुढील काही दिवसांत इंधनाचे दर कमी होतील, जनतेला त्रास देणं सरकाराचा उद्देश नसल्याचेही आठवलेंनी म्हटलं. आठवलेंनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना विविध विषयांसंदर्भात आपलं मत मांडलं.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधी