शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या जागी तरुण नेतृत्वाला संधी द्यावी - अमरिंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 04:46 IST

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पुरोगामी दृष्टिकोन असलेला तरुण नेताच पक्ष कार्यकर्त्यांत जोश निर्माण करू शकेल.

- शीलेश शर्मा 

चंदीगड : राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदावर केवळ प्रभावशाली तरुण नेतृत्वालाच संधी द्यायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केले.

अमरिंदरसिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पुरोगामी दृष्टिकोन असलेला तरुण नेताच पक्ष कार्यकर्त्यांत जोश निर्माण करू शकेल. अखिल भारतीय पातळीवर आवाहन क्षमता असलेला, तसेच तळागाळापर्यंत अस्तित्व असलेल्या करिश्माई तरुण नेत्यालाच राहुल गांधी यांच्या जागी स्थान द्यायला हवे.

अमरिंदरसिंग यांनी म्हटले की, तरुण नेतृत्वाने पक्षाची धुरा हाती घेऊन पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचा मार्ग राहुल गांधी यांनी दाखवून दिला आहे. तरुण लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगाचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे लोकभावना समजून घेणे आणि तिच्याशी समरूप होणे हे तरुण नेतृत्वाला प्रभावीपणे साध्य होणे हे नैसर्गिकच आहे. भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील आहे. पक्ष नेतृत्वात बदल करताना भारतीय समाजाचे हे वास्तव त्यात प्रतिबिंबित व्हायलाच हवे.

सिंग यांनी म्हटले की, राजीनाम्यावर ठाम राहण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय पक्षासाठी निश्चितच निराशाजनक आणि धक्कादायक आहे. त्यांच्यासारख्याच तरुण आणि प्रभावशाली नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्ष या धक्क्यातून सावरू शकतो. सर्वांत जुन्या पक्षाला तरुण नेताच पुनरुज्जीवित करू शकतो. राहुल गांधी यांनी पक्षात भरलेली ऊर्जा काँग्रेस नेत्यांनी कायम ठेवायला हवी. पक्षाला पुन्हा एकमेव पर्यायाच्या स्थितीत नेण्यासाठी एका तरुण नेतृत्वाची गरज आहे. अमरिंदर सिंग यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदी अशा तरुण नेत्याची निवड व्हायला हवी, जो भारतातील बहुसंख्य लोकांशी समरूप होऊ शकेल, जो पक्षाला नव्या विचाराचा डोस देऊ शकेल, जो देशाला सत्ताधारी भाजपच्या प्रतिगामी आणि विध्वंसक धोरणांपासून वाचवू शकेल.हालचाली गतिमानदरम्यान, नवीन अध्यक्ष निवडण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये गतिमान झाल्या आहेत. नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी होणाऱ्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीस राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी या उपस्थित राहणार नसल्याचे समजते.राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, पक्षाचे ज्येष्ठ सरचिटणीस या नात्याने मुकुल वासनिक अध्यक्षपदासाठी दावा सादर करीत आहेत. अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास ज्येष्ठ सरचिटणीसाकडे अध्यक्षपद सोपविण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.काँग्रेस पक्षातील अधिकांश नेते मात्र अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाला अधिक पसंती देत आहेत. त्यातही गेहलोत आणि खडगे हे स्पर्धेत पुढे आहेत.