शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मानहानी प्रकरणी राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा, १५ हजारांचा दंड, उच्च न्यायालयात जाण्यासाठी शिक्षा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 07:09 IST

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीनवेळा न्यायालयात हजर झाले.

सुरत : ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते...’ या २०१९ मध्ये केलेल्या विधानाशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधींना दोषी ठरवले. या निर्णयाच्या २७ मिनिटांनंतर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंडही ठोठावला. काही काळानंतर त्याच न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला. तसेच, शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली. सुनावणीदरम्यान राहुल गांधी न्यायालयात हजर होते.

न्यायाधीशांनी राहुल गांधी यांना दोषी ठरवले आणि विचारले की, काही बोलायचे आहे का? त्यावर राहुल गांधी यांचे वकील बाबू मांगुकिया म्हणाले की, राहुल गांधी भ्रष्टाचाराविरोधात बोलले; पण जाणूनबुजून काहीही बोलले नाही. त्यांच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान झालेले नाही, त्यामुळे किमान शिक्षा व्हावी. दुसरीकडे फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, राहुल गांधी हे खासदार आहेत, जे कायदा करतात. त्यांनीच तो मोडला तर समाजात काय संदेश जाईल, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. राहुल गांधी यांचे वकील न्यायालयात म्हणाले, आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी राहुल गांधींकडे ३० दिवसांचा अवधी आहे. (वृत्तसंस्था)

काय आहे प्रकरण? २०१९च्या निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ मग तो ललित मोदी असो की नीरव मोदी असो की नरेंद्र मोदी’, असे म्हटले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीनवेळा न्यायालयात हजर झाले.

निर्णयाला आव्हान दिल्यास खासदारकी राहणारजुलै २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ज्या लोकप्रतिनिधींना (आमदार-खासदार) न्यायालयात दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाली आहे, त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्यांना सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश लागू होणार नाही, असे स्पष्ट केले होते.

दयायाचना नाहीराहुल यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, यामुळे कोणाचेही नुकसान झालेले नाही. म्हणूनच आम्ही दया मागत नाही.

सत्य हाच माझा देव आहे...शिक्षा जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचे वचन ट्वीट केले. ‘माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा देव आहे, अहिंसा ते मिळवण्याचे साधन - महात्मा गांधी’, असे ट्वीट त्यांनी केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणGujaratगुजरात