शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थासाठी नितीश कुमार जातीयवादी शक्तींसोबत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:19 IST

भाजपासोबत हातमिळवणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी निशाणा साधला.

नवी दिल्ली : भाजपासोबत हातमिळवणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी निशाणा साधला. आपल्या स्वार्थी राजकीय हेतूसाठी नितीश कुमार हे जातीयवादी शक्तींकडे परत गेले असल्याची टीका त्यांनी केली.राहुल गांधी म्हणाले की, हे राजकारण तीन ते चार महिन्यांपासून शिजत होते, याची आपल्याला कल्पना होती. बिहारच्या ज्या आघाडीमधून जनता दल युनायटेड पक्ष बाहेर पडला आहे त्या आघाडीचा काँग्रेस पक्ष एक घटक होता. ते म्हणाले की, नितीश कुमार यांनी जातीयवादी शक्तींविरुद्धच्या लढाईत आमच्यासोबत हात मिळविला होता. पण ज्यांच्याविरुद्ध ते लढले आहेत त्यांच्यासोबतच आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी हातमिळवणी केली आहे. भारताच्या राजकारणातील हीच मोठी समस्या आहे.बिहारमधील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, राजकारणात लोकांच्या मनात काय चालू आहे याची कल्पना असते. मला हे माहीत होते की, नितीश कुमार अशी काहीतरी योजना आखत आहेत. मागील तीन-चार महिन्यांपासून हे राजकारण सुरू होते. लोक आपल्या स्वार्थी हेतूसाठी काहीही करू शकतात. कोणतेही तत्त्व, विश्वसनीयता राहिली नाही. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात.नितीश कुमार यांचे बदलते राजकारण त्यांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही, असे मत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, याबाबत मी अधिक भाष्य करणार नाही. पण नितीश कुमार यांची सतत बदलत जाणारी भूमिका त्यांच्यासाठीच चांगली नाही.संसदेतही भाजपाला पाठिंबा - त्यागीपाटणा : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संयुक्त जनता दल यापुढे भाजपाला पाठिंबा देईल, अशी घोषणा गुरुवारी त्या पक्षाचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी केली. बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर याबाबत बोलताना के. सी. त्यागी म्हणाले की, काँगे्रस पक्ष भ्रष्टाचाराबाबत गंभीर नाही.काँग्रेसवर विश्वास ठेवणे ही मोठी चूक होती. मोदी सरकारमध्ये सहभागी होणार का, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व यावर निर्णय घेईल. ते म्हणाले की, नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये हा फरक आहे की, नितीश कुमार हे भ्रष्टाचाराबाबत तडजोड करत नाहीत तर राहुल गांधी याबाबत तडजोड करतात.