शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत परतले राहुल गांधी; अविश्वासावर रंगणार वाक् युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 06:25 IST

१३७ दिवसांनी खासदारकी बहाल; ‘इंडिया’कडून जाेरदार स्वागत

- संजय शर्मा/आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोदी आडनावप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तीन दिवसांनी सोमवारी त्यांना त्यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर तब्बल १३७ दिवसांनी राहुल गांधी यांचे लोकसभेत पुनरागमन झाले. यावेळी त्यांचे ‘इंडिया’ गटाच्या सदस्यांनी स्वागत केले. संसदेत मंगळवारी मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार असून त्याची सुरुवात राहुल गांधी करण्याची शक्यता आहे. लोकसभेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी दुपारी संसदेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या कामकाजात भाग घेतला. मात्र, मणिपूरच्या मुद्द्यावरून  गदराेळ झाल्यानंतर काही मिनिटांतच सभागृह तहकूब झाले. 

सरकारही सज्जअविश्वास ठरावावर उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारकडून पश्चिम बंगाल आणि राजस्थानच्या खासदारांना बाेलण्यास सांगितले जाईल. भाजपकडून लॉकेट चॅटर्जी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत यांना उतरविले जाऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही बोलू शकतात.

सरकारी घर परत मिळेल का? राहुल गांधी यांना तुघलक लेन भागातील घर परत मिळविण्यासाठी संसदीय गृहनिर्माण समितीकडे पुन्हा अर्ज करावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. हा बंगला अद्याप कुणालाही दिला नाही. 

ट्विटर प्रोफाइल बदलले...संसद सदस्यत्व बहाल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचे ट्विटर प्रोफाइलचे वर्णन बदलून ‘संसद सदस्य’ असे केले. अपात्रतेनंतर त्यांनी ते ‘अपात्र संसद सदस्य’ असे केले होते.

तीन दिवस सत्ताधारी-विरोधकांत जुंपणारn अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, मनीष तिवारी, शशी थरूर यांना बोलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. n महागाई, बेरोजगारी, ईडी, चीनी आक्रमकता आणि सीबीआयचा गैरवापर, या मुद्द्यांसह मणिपूरमध्ये महिलांसोबत झालेली वागणूक आणि तिथे सुरू असलेला हिंसाचार हे विरोधकांचे प्रमुख मुद्दे राहणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र माेदी गुरुवारी देणार उत्तरदोन ते तीन दिवस चालणाऱ्या या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी उत्तर देणार आहेत. पंतप्रधानांचे अविश्वास प्रस्तावावरील भाषण हे विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ या आघाडीतील २६ पक्षांवर हल्लाबोल करणारे ठरेल. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNo Confidence motionअविश्वास ठरावlok sabhaलोकसभा