शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

लालूप्रसाद यादव यांच्या शापामुळे राहुल गांधी यांची खासदारकी गेली- गिरिराज सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 09:03 IST

पाटणा : ‘राजद नेते लालूप्रसाद यादव यांचा शाप लागल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली’, असे प्रतिपादन केंद्रीय ...

पाटणा : ‘राजद नेते लालूप्रसाद यादव यांचा शाप लागल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली’, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे. ते म्हणाले की, ‘चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर लालू यांची खासदारकी जाणार होती. त्यांची खासदारकी वाचण्यासाठी अपिलाची तरतूद असलेला अध्यादेश राहुल गांधी यांनी फाडला हाेता. तेव्हा लालूप्रसाद यांनी राहुल गांधी यांना शाप दिला होता. 

भाजप लोकांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करत आहे - सिब्बल  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर टिप्पणी करून ओबीसींचा अपमान केला आहे, असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. त्यावर राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी पलटवार केला आहे. भाजपच्या दोन नेत्यांवर टीका करताना सिब्बल म्हणाले की, असे निरर्थक आरोप करून भाजप लोकांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करत आहे. 

 ‘माकप’चा दुहेरी अजेंडा : काँग्रेस   केरळमध्ये सत्तारुढ माकप आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन हे एकीकडे राहुल गांधी यांचे समर्थन करतात, तर दुसरीकडे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करायला सांगतात, असा दुहेरी अजेंडा राबवत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी केला. 

 राहुल माफी मागू शकले असते : हिमंता सरमा ज्या वक्तव्याबद्दल न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली ते वक्तव्य ते मागे घेऊ शकले असते किंवा त्याबद्दल माफी मागू शकले असते, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा म्हणाले. सरमा म्हणाले, कधी कधी जीभ घसरते. आम्हीही याचा अनुभव घेतलेला आहे. मात्र, आम्ही माफी मागणारे निवेदन प्रस्तुत करून हे अनावधानाने झाले होते, असे सांगतो. राहुलदेखील असे करू शकले असते आणि विषय संपला असता.

केंद्राने मोठे मन दाखवायला हवे होते : प्रशांत किशोरराहुल गांधी यांना झालेली दोन वर्षांची शिक्षा ‘अति’ असल्याचे सांगून राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी सत्ताधारी पक्षाला ‘मोठे मन’ दाखवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, कायदेशीर प्रक्रियेचा आदर करता राहुल यांनी सुनावण्यात आलेली शिक्षा जास्त वाटते. निवडणुकीच्या काळात लोक सर्व प्रकारची वक्तव्ये करतात. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव