शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

राष्ट्रपतींना आज दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे देणार निवेदन, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 07:04 IST

Farmers Protest : पंजाबमध्येही जोरदार विरोध नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनीही संघर्षाची भूमिका घेतली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या कायद्यांविरोधात दोन कोटी लोकांनी स्वाक्षरी केलेले एक निवेदनही काँग्रेसकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर केले जाईल.या मोर्चामध्ये काँग्रेसचे सर्व खासदार व नेते, कार्यकर्ते सहभागी होतील. नव्या कृषी कायद्यांविरोधातील निवेदनावर काँग्रेसने देशभरातून दोन कोटी लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. हे कायदे रद्द करण्यात यावेत, याकरिता राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस पक्ष करणार आहे.पंजाबमध्येही जोरदार विरोध नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनीही संघर्षाची भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या कायद्यांच्या विरोधात पंजाबमध्ये ट्रॅक्टर यात्रा काढण्यात आली होती. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरील रस्ते गेल्या काही दिवसांपासून रोखून धरले आहेत. ठिकठीकाणी ठिय्या मांडून शेतकऱ्यांचे जथ्थे आपला असंतोष व्यक्त करीत आहेत.

विजय चौकातून रवाना होणार मोर्चाया कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, त्याला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस हा मोर्चा काढणार आहे. गुरुवारी दिल्लीतील विजय चौकातून हा मोर्चा राष्ट्रपती भवनाकडे रवाना होईल. नवीन कृषी कायद्यांबाबतची विधेयके संसदेत मंजुरीसाठी मांडली गेली, त्याच वेळेपासून या विधेयकांविरोधात दोन कोटी लोकांच्या स्वाक्षऱ्या देशभरातून गोळा करण्याची मोहीम काँग्रेसने राबवायला सुरुवात केली होती.

विशेष अधिवेशनास नकार तिरुवनंतपुरम : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध चर्चा करण्यासाठी आणि ठराव घेण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याची परवानगी देण्यास केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी नकार दिला आहे. विशेष अधिवेशन बोलविण्यासारखी परिस्थिती नाही, असे सांगत राज्यपालांनी यास नकार दिला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीRahul Gandhiराहुल गांधीFarmer strikeशेतकरी संप