शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

राहुल गांधी यांनी अमेठीमधून दाखल केला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 6:46 AM

सारे गांधी कुटुंबीय उपस्थित; रोड शोला जनतेने दिला प्रतिसाद

अमेठी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला परंपरागत मतदारसंघ अमेठीमधून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियांका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा, त्यांची दोन मुले रैहान व मिराया असा सारा गांधी परिवार उपस्थित होता.

त्या आधी राहुल गांधी यांनी केलेल्या तीन किलोमीटरच्या रोड शोला लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यावेळीही गांधी परिवारातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. सोनिया गांधी उद्या, गुरुवारी निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी राहुल, प्रियांका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही हजर असतील.

राहुल गांधी अमेठीसोबतच वायनाडमधूनही निवडणूक लढवत आहेत. अमेठीमध्ये त्यांची लढत भाजपच्या स्मृती इराणींशी आहे. येथून राहुल तीनदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी केलेल्या रोड शोमध्ये फुलांनी सजविलेल्या एका ट्रकमध्ये राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, प्रियांका यांची दोन मुले व काँग्रेस कार्यकर्ते उभे होते. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभे असलेले लोक व रोड शोमध्ये सहभागी झालेले काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांना पुष्पहार अर्पण करत होते.बुधवार सकाळपासून अमेठीमध्ये अतिशय जल्लोषाचे वातावरण होते. राहुल गांधी व गांधी परिवाराच्या सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.

राहुल गांधी यांच्या नावाचा काँग्रेसचे कार्यकर्ते जयजयकार करत होते. ढोल वाजवून, नृत्य करून काही कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्षांचे स्वागत करणारे फलक, भित्तीपत्रके संपूर्ण शहरभर लावण्यात आली होती. ‘विकास की आँधी, प्रियांका गांधी’, ‘अमेठी का साँसद, देश का पीएम अशा’ घोषणा या फलकांवर लिहिलेल्या होत्या. अमेठीच्या आसपासच्या गावांमधील शेकडो लोकही राहुल गांधी यांचा रोड शो पाहायला आले होते.

रोड शोमध्ये यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी सहभागी झाल्या नव्हत्या. मात्र, राहुल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी सोनिया गांधी उपस्थित होत्या. (वृत्तसंस्था)माझ्या वडिलांची कर्मभूमीमाझे वडील राजीव गांधी यांची अमेठी ही कर्मभूमी होती. गांधी परिवारासाठी अमेठी हे पवित्र ठिकाण आहे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. काही नाती हृदयाशी जोडलेली असतात, असेही त्यांनी सांगितले.
स्मृती इराणी आज अर्ज भरणार
राहुल गांधी यांच्या अमेठी व सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघांत समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व राष्ट्रीय लोक दल यांच्या आघाडीने उमेदवार उभा केलेला नाही. भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उद्या, गुरुवारी अर्ज भरणार असून, त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही असतील. सोनिया गांधी याही उद्याच रायबरेलीतून अर्ज दाखल करणार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीamethi-pcअमेठीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक