शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या कारकीर्दीत बेरोजगारी प्रचंड वाढली; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 07:35 IST

उद्योगांवरही आले संकट

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कारकीर्दीत नोकऱ्याच उपलब्ध होत नसल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते म्हणाले की, बेरोजगारी इतकी वाढली आहे की, आठवड्याची सुटी व कामाचे दिवस यांच्यातला पूर्वी जो फरक होता तोच संपत चाललेला आहे. हाताला काम नाही अशी अनेकांची स्थिती आहे. भारतात करत असलेली वाहननिर्मिती थांबविण्याचा निर्णय फोर्ड या अमेरिकी कंपनीने घेतला आहे. त्यामुळे ४ हजार लघुउद्योगही बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, काम नसलेला दिवस कोणता व सुट्टीचा दिवस कोणता यातला फरक ओळखता येणार नाही अशी स्थिती मोदी सरकारच्या काळात निर्माण झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

पोकळ दावे

आमच्या कारकीर्दीत देशात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली, रोजगारीचे प्रमाणही वाढत आहे असे पोकळ दावे मोदी सरकारकडून केले जातात. मात्र कोरोना साथीच्या काळात बसलेल्या फटक्यातून लहानमोठे उद्योगधंदे अद्याप पुरेसे सावरलेले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी याआधीही केली होती. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीUnemploymentबेरोजगारीCentral Governmentकेंद्र सरकार