शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: राहुल गांधींकडून आदिवासी, दलित, ओबीसीचा उल्लेख; अर्थमंत्र्यांनी कपाळावर हात मारला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 16:28 IST

लोकसभेत अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे अर्थमंत्र्यांनी डोक्यावर हात मारला.

Rahul Gandhi in Lok Sabha : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी, पेपरफुटी, अर्थसंकल्प या मुद्द्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरले. देशातील दलित आणि मागासवर्गीयांना कुठेही स्थान मिळत नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी  राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मात्र या भाषणादरम्यान एकवेळ अशी आली की, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणावेळी जोरदार राडा झाला. महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. चक्रव्यूहात देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक अडकले आहेत. या चक्रव्यूहाचं चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या छातीवर लावून फिरतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. मात्र अर्थसंकल्पाबाबत बोलताना राहुल गांधी यांचे भाषण ऐकून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला. 

अर्थसंकल्प सादर होण्याआधी पार पडणाऱ्या हलवा समारंभाचा उल्लेख केला. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कपाळावर दोन्ही हात मारले. राहुल गांधी यांनी सभागृहात हलवा समारंभाचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नकार दिला. 'बजेटचा हलवा वाटला जात असल्याचा फोटो दाखवून मला स्पष्ट करायचे आहे की, या फोटोत ओबीसी अधिकारी दिसत नाही. आदिवासी अधिकारी आणि दलित अधिकारीही दिसत नाहीत. हे काय सुरु आहे? देशाचा हलवा वाटला जात आहे आणि त्यात तेच लोक नाहीत," असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींचे भाषण ऐकून सीतारमन यांनी हसत दोन्ही हात कपाळावार मारले.

या गदारोळात राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. "तुम्ही हलवा खात आहात आणि इतरांना हलवा मिळत नाही. २० अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकल्याचे आम्हाला आढळून आले आहे. तुम्हा लोकांना नावे हवी असतील तर मी तुम्हाला या अधिकाऱ्यांची नावेही देऊ शकतो," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन