शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

राहुल गांधी अयोध्येत

By admin | Updated: September 10, 2016 03:59 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अयोध्या येथील हनुमानगढी मंदिरात दर्शन घेतले.

अयोध्या : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अयोध्या येथील हनुमानगढी मंदिरात दर्शन घेतले. १९९२ मध्ये वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्यानंतर अयोध्येला भेट देणारे नेहरू-गांधी कुटुंबाचे ते पहिले सदस्य आहेत. राहुल गांधी यांची उत्तरप्रदेशात किसान यात्रा सुरू आहे. यात्रेच्या चौथ्या दिवशी त्यांनी हनुमानगढी मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी महंद ग्यानदास यांची भेट घेतली. ग्यानदास विश्व हिंदु परिषदेचे कडवे विरोधक मानले जातात. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडण्यात आल्यानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल हे नेहरू-गांधी कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. त्हनुमान गढी अयोध्येतील वादग्रस्त भागापासून एक किलोमीटरवर आहे. १९८९मध्ये राममंदिरासाठी जेथे भूमिपूजन करण्यात आले होते त्या ठिकाणापासूनही राहुल दूर राहिले.२६ वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी १९९० च्या आपल्या सद्भावना यात्रेदरम्यान हनुमानगढी मंदिरात दर्शन घेण्याची योजना आखली होती. मात्र, काही कारणांमुळे ते मंदिरात येऊ शकले नव्हते. राजीव गांधी यांची २१ मे १९९१ मध्ये हत्या करण्यात आली होती. तेव्हा राहुल २० वर्षांचे होते. (वृत्तसंस्था)>आशीर्वाद घेण्यासाठी आले होते राहुल राहुल यांनी महंत ग्यानदास यांच्याशी बंदद्वार चर्चा केली नंतर महंत ग्यानदास म्हणाले की, राहुल आम्हा लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. नेत्याने साधू-संतांकडे जावे ही काही मोठी गोष्ट नाही. कोणी आशीर्वाद घ्यायला येतो तर त्याची काही ना काही अपेक्षा तर असतेच. आशीर्वाद मागणाऱ्याचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना करण्यात येते.