शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी, तुम्ही संयमाने बोला! लोकसभाध्यक्षांना असे का म्हणावे लागले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:41 IST

लोकसभेचे रद्द झालेले सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने बहाल केल्यानंतर सभागृहात परतलेल्या राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून अविश्वास प्रस्तावावरील भाषणाची सुरुवात केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रातील सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची, देशाची, हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही देशभक्त नाही, देशद्रोही आहात. तुम्ही भारतमातेचे रक्षणकर्ते नाही तर भारतमातेचे हत्यारे आहात. तुम्ही मणिपूरपाठोपाठ हरयाणात आणि संपूर्ण देशात केरोसिन शिंपडत असून साऱ्या देशाला जाळण्यात गुंतलेले आहात, असा जोरदार हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केला.    

लोकसभेचे रद्द झालेले सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने बहाल केल्यानंतर सभागृहात परतलेल्या राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून अविश्वास प्रस्तावावरील भाषणाची सुरुवात केली आणि नंतर अतिशय आक्रमक आवेशात मणिपूरवरील केंद्र सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला. 

भारत हा आमच्या जनतेच्या हृदयाचा आवाज आहे; पण मणिपूरच्या लोकांना जिवे मारून तुम्ही भारताची हत्या केली आहे. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

लंकेला रावणाच्या अहंकाराने जाळलेराहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुस्थानच्या हृदयाचा आवाज ऐकत नसतील तर ते कोणाचा आवाज ऐकतात? ते दोनच लोकांचा आवाज ऐकतात. रावण दोनच लोकांचे ऐकायचा. मेघनाद आणि कुंभकर्णाचे. तसेच, नरेंद्र मोदी दोन लोकांचेच ऐकतात. अमित शाह आणि अदानींचे. लंकेला हनुमानाने नाही जाळले. लंकेला रावणाच्या अहंकाराने जाळले, असे राहुल गांधी म्हणाले. रामाने रावणाला मारले नाही. रावणाला त्याच्या अहंकाराने मारले, असे राहुल गांधी म्हणाले. त्यावर हे सभागृह आहे. तुम्ही संयमाने बोला, असे आवाहन अध्यक्ष बिर्ला यांनी राहुल गांधी यांना केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन