शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल व शहांचा झंझावाती प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 03:51 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकात विजय मिळवायचाच या इर्षेने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना झपाटले आहे. अमित शाह व राहुल गांधी हे असे पहिले पक्षाध्यक्ष आहेत

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकात विजय मिळवायचाच या इर्षेने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना झपाटले आहे. अमित शाह व राहुल गांधी हे असे पहिले पक्षाध्यक्ष आहेत, ज्यांनी आतापर्यंत विधानसभा निवडणुकांसाठी एखाद्या राज्याचे सर्व जिल्हे पिंजून काढले असतील.निवडणुकांच्या व्यूहरचनेचे काम पक्षाध्यक्ष करतात, असा अनुभव आहे. मात्र कर्नाटकात राहुल गांधी व अमित शहा कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाहीत. राहुल गांधी यांनी आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्याला भेट दिली असून, त्यासाठी साडेतीन हजार किमीचा प्रवास केला. दौऱ्यात त्यांनी दोन डझन मंदिरे व मठांना भेटी दिल्या.सामान्य माणसाशीनाळ जोडण्याचा प्रयत्नराहुल यांनी प्रचारात पक्षश्रेष्ठी म्हणून न वावरता आपल्यापेक्षा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सभांमध्ये अधिक महत्व दिले. मंदिरातील पुजाºयांना वंदन करणे, फेरीवाल्याकडून काकडी विकत घेणे, गाडी थांबवून रस्त्यात लहान मुलांना जवळ घेणे, मेट्रो तिकिटासाठी रांगेत उभे राहाणे, प्रवाशांना आपल्यासह सेल्फी काढण्यास संमती देणे, टपरीवर चहा पिणे यातून राहुल यांनी सामान्य माणसाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला.कार्यकर्त्यांचेमनोबल वाढविण्यावर भरभाजपाध्यक्ष अमित शहा हेही आक्रमकपणे प्रचार करीत आहेत. त्यांनीही सर्व जिल्ह्यांना भेटी दिल्या व ठिकठिकाणी प्रचारयात्रा काढल्या. या दौºयांत पक्षाच्या लहान कार्यकर्त्यांशी तसेच व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार अशा विविध गटांतील लोकांशी शहा यांनी सविस्तरचर्चा केली आणि त्यांची मतेजाणून घेतली. राज्यातील परिस्थितीबाबत स्थानिक नेत्यांच्या माहितीवर विसंबून न राहाता स्वत:च्या स्रोतांकडून माहिती मिळवून शहा यांनी तिकीटवाटप व इतर काही निर्णय घेतले. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे, यावर त्यांचा भर आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८