शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

खासदारांसाठी खुशखबर! आता संसदेच्या कॅन्टीन मेनूमध्ये दिसणार 'हे' खास पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 11:00 IST

Parliament Millets Menu : रविवारीच (दि.२९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात बाजरीचा उल्लेख केला होता.

नवी दिल्ली : सध्या सरकार बाजरीचे उत्पादन आणि वापर वाढवण्यावर भर देत आहे. याच पार्श्वभूमीवर आता बाजरीपासून बनवलेल्या अनेक खास पदार्थांचा समावेश संसदेच्या कॅन्टीन मेनूमध्ये होणार आहे. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या कॅन्टीनच्या मेनूमध्ये लवकरच ज्वारीपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांपासून ते बाजरीची खिचडी, नाचणीचे लाडू आणि बाजरीचा चुरमा पाहायला मिळणार आहे. याशिवाय, मेन्यूमध्ये पारंपरिक बिर्याणी आणि कटलेटही असतील.

रविवारीच (दि.२९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात बाजरीचा उल्लेख केला होता. 'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमात बाजरीचे पदार्थ सादर केले जातील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही खासदारांसाठी खास बाजरीच्या मेनूची मागणी केली आहे. त्यानंतर आता खासदार जुन्या मेनूशिवाय नवीन मेनूमधून आपल्या आवडीचे पदार्थ निवडू शकतील.

मेनूमध्ये बाजरीचे सूप, नाचणी डोसा, नाचणी तूप भाजणे, नाचणी थत्ते इडली, ज्वारीची भाजी उपमा हे स्टार्टर्स असतील. याशिवाय, मुख्य कोर्स म्हणून मका/बाजरी/ज्वारीच्या रोटीसोबत मोहरीच्या हिरव्या भाज्या, बटाटाच्या भाजीसोबत नाचणीची पुरी, बाजरीची मिक्स खिचडी आणि लसूण चटणीसोबत बाजरीची खिचडी असणार आहे. तसेच, मिठाईंमध्ये केसरी खीर, नाचणी- अक्रोडाचे लाडू आणि बाजरीचा चुरमा यांचा समावेश करण्यात आला आहे.

देशातील विविधतेचे दर्शन घडेल अशा पद्धतीने मेन्यूची रचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मेनूमध्ये ओट्स मिल्क, सोया मिल्क, नाचणी-मटरचा शोरबा, बाजरी कांदा मुथिया (गुजरात), शाही बाजरीची टिक्की (मध्य प्रदेश), नाचणीचा डोसा आणि शेंगदाणा चटणी (केरळ), राजगिरा कोशिंबीर आणि कोरा बाजरी कोशिंबीर यांचा समावेश आहे.

कोणी तयार केला मेनू?आयटीडीसीचे (ITDC) मोंटू सैनी यांनी खासदारांसाठी मिलेट्स मेनू तयार केला. मोंटू सैनी यांनी राष्ट्रपती भवनात एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून साडेपाच वर्षे काम केले आहे. यादरम्यान प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद हे देशाचे राष्ट्रपती होते. आयटीडीसी 2020 पासून संसदेचे कॅन्टीन चालवत आहे. हिवाळी अधिवेशनात संसद भवनात खासदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनात नाचणी अक्रोडाचे लाडू आणि बाजरीचे सूप यांना सर्वाधिक मागणी असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Parliamentसंसद