शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आल्यास राफेल करारात नक्की दुरुस्ती करणार : पी. चिदम्बरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 00:54 IST

आम्ही सत्तेत आल्यास फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीशी राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार रद्द करणार नाही. मात्र करार अधिक चांगल्या पद्धतीने करुन अधिक राफेल विमाने विकत घेण्यात येतील, असे काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले.

नवी दिल्ली : आम्ही सत्तेत आल्यास फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीशी राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार रद्द करणार नाही. मात्र करार अधिक चांगल्या पद्धतीने करुन अधिक राफेल विमाने विकत घेण्यात येतील, असे काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्याच्या करारातील आॅफसेट पार्टनरचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी विमानांची संख्या, किंमती व विमाने भारतास मिळण्याची मुदत हे मुद्देही अतिशय महत्त्वाचे आहेत.राफेल प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी हे अन्य कंपनीच्या फायद्यासाठी हे आरोप करीत असल्याची टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आम्ही राफेलचा करार रद्द करणार नाही, असे चिदम्बरम यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.राफेल विमान खरेदी व्यवहाराची चौकशी संसदीय समितीमार्फतच व्हायला हवी, अशी आपली भूमिका आहे, असे सांगताना, या प्रश्नावर न्यायालयात जाऊ न काही उपयोग होणार नाही, असे आपले सुरुवातीपासून मत होते, असे त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. ते म्हणाले की, यूपीएचे सरकार असतानाच राफेल विमाने खरेदी करण्याचे ठरले होते. राफेलची लढाऊ विमाने उत्तम दर्जाची असल्याने ती घेण्याबाबत कोणाचेच दुमत नाही. त्यामुळे करार रद्द करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. मात्र करारात दुरुस्ती करून देशाला वेळेत, कमी किमतीत विमाने मिळतील, हे आम्ही नक्कीच पाहू.राफेल विमान खरेदीविषयीचा कॅगचा अहवाल बुधवारी संसदेत सादर करण्यात आला. त्यात यूपीए सरकारच्या काळातील करारापेक्षा आता ही विमाने २.८६ टक्क्यांनी स्वस्तात मिळणार असल्याचा उल्लेख आहे. मात्र कराराचे उल्लंघटन फ्रान्स सरकार जबाबदार असेल, ही आधीच्या करारातील अट नव्या करारात काढून टाकल्याने जोखीम वाढली असल्याचा उल्लेख कॅगच्या अहवालात आहे.३६ विमाने अपुरीहवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी १२६ राफेल विमानांची गरज असल्याचे आम्ही सत्तेत असतानाच म्हटले होते. केवळ ३६ विमानांनी भागणार नाही. त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यास १२६ विमाने लवकर मिळावीत, यासाठी फ्रान्स व कंपनीशी पुन्हा चर्चा केली जाईल, असेही चिदम्बरम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलP. Chidambaramपी. चिदंबरम