शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

राफेलवरून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; पी. चिदम्बरम यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 1:06 AM

राफेल विमान खरेदी व्यवहार, शेअर बाजार गडगडणे, रुपयाची सुरू असलेली घसरण हे विषय अडचणीचे ठरल्याने मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला आहे.

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी व्यवहार, शेअर बाजार गडगडणे, रुपयाची सुरू असलेली घसरण हे विषय अडचणीचे ठरल्याने मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला आहे.राफेल खरेदी व्यवहारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स लिमिटेड या कंपनीवर मेहेरनजर केली असल्याचा आरोप काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. हे आरोप सरकार व रिलायन्स डिफेन्स लि. कंपनीने फेटाळून लावले आहेत.ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, राफेल प्रकरणातील गैरव्यवहार उजेडात आल्याने सरकार अस्वस्थ आहे. रुपयाची घसरण सुरू असून, शेअर बाजार कोसळत आहेत. व्याजदर वाढले आहेत.या गोष्टींबद्दल बोलणाऱ्या विरोधकांचा आवाज पद्धतशीररीत्या दडपला जात आहे. ग्रीनपीसची बँकखाती अंमलबजावणी संचालनालयाने गोठविली. मीडिया क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक राघव बहल यांच्या घर व कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. भाजपचे खासदार अंदाज समित्यांचे अहवाल संसदेत मांडण्यामध्ये अनेकअडथळे आणतात. अशा अनेक गोष्टी सध्या घडत आहेत. राफेल विमाने खरेदी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा, अशीमागणी काँग्रेसकडून सातत्याने होत आहे.कार्तीवरील कारवाईचा टष्ट्वीटमध्ये उल्लेख नाहीपी. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती चिदम्बरम यांच्या ५४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने टाच आणली आहे. तसेच कार्तीच्या इंग्लंड, स्पेन, तामिळनाडूतील उटीच्या बंगल्यांनाही टाळे ठोकण्यात आले आहे.कार्तीच्या आयएनएक्स मीडिया हाऊसला बेकायदेशीरपणे पैसा मिळत असल्याचा आरोप झाला होता. अशा प्रकरणांपायीच ही कारवाई झाली. मात्र, त्याचा उल्लेख करण्याचे पी. चिदम्बरम यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये टाळले आहे.तसेच कार्तीच्या मालकीचा बार्सिलोना येथील टेनिस क्लब, इंग्लंडमधील एक कॉटेज हाऊस, चेन्नईच्या बँकेतील ९० लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट व अन्य काही मालमत्ताही अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतली आहे.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमRafale Dealराफेल डील