शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलदारांच्या फायद्यासाठीच राफेल करार; राहुल गांधींचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:10 IST

नवी दिल्ली : लबाड भांडवलदारांच्या फायद्यासाठी राफेल लढाऊ विमानांचा खरेदी करार पुन्हा करण्यात आला आणि जगात भारताची प्रतिष्ठा कमी ...

नवी दिल्ली : लबाड भांडवलदारांच्या फायद्यासाठी राफेल लढाऊ विमानांचा खरेदी करार पुन्हा करण्यात आला आणि जगात भारताची प्रतिष्ठा कमी झाली, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर हल्ला केला.

फेसबुक पोस्टवर गांधी यांनी म्हटले आहे की, करारासाठी वाटाघाटी पुन्हा करण्यात आल्यामुळे भारताला तंत्रज्ञान हस्तांतर होऊ शकणार नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात भारताला तंत्रज्ञान हस्तांतरण ठरले होते. नवे तंत्रज्ञान भारतात येऊ न शकल्यामुळे पुरातन जग्वार विमाने चालवताना भारतीय विमानचालकांचे जीवित धोक्यात आले आहे ही लाजिरवाणी बाब आहे. १२६ राफेल विमानांसोबत तंत्रज्ञान मिळवण्याऐवजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने फ्रान्समध्ये बनवलेल्या ३६ विमानांचा खरेदी व्यवहार केला, असा आरोप राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्तांच्या आधारे केला. १२६ राफेल विमाने तंत्रज्ञानासह आली असती तर भारतीय हवाई दलात मोठे परिवर्तन घडले असते, असेही गांधी म्हणाले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने वाटाघाटी केलेल्या व्यवहारांना पूर्ण करण्याऐवजी २०१४ पासून मोदी सरकार लबाड भांडवलदारांच्या फायद्यासाठी फेरवाटाघाटी करीत आहे, असे गांधी म्हणाले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने १२६ राफेल विमानांसाठी केलेल्या करारामुळे भारतीय हवाई दलाचा चेहरा बदलला असता....तर स्वावलंबी झालो असतोआधीच्या करारात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचाही समावेश होता. तंत्रज्ञानामुळे भविष्यात आम्ही स्वावलंबी व्हायला मदत झाली असती. हे न करता अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी खरेदी व्यवहार पुन्हा केला व फक्त ३६ विमानेच येणार आहेत व ती यायलाही कित्येक वर्षे लागतील, असे या पोस्टमध्ये गांधी यांनी म्हटले.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील