शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

मुंद्रा पोर्टवर किरणोत्सारी पदार्थ जप्त, पाकिस्तानचे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 07:14 IST

कस्टम विभागाची कारवाई, पाकमधून चीनला पाठवलेला माल

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाकिस्तानातून चीनला पाठविण्यात आलेले घातक किरणोत्सरी पदार्थ गुजरातच्या मुंद्रा पाेर्टवर जप्त केले आहेत. हे पदार्थ असलेले कार्गाे कंटेनर्स मुंद्रा पाेर्टवर येणे अपेक्षित नव्हते. अदानी पोर्टस  आणि एसईझेडतर्फे ही माहिती देण्यात आली. मोठ्या प्रमाणावर रेडिओॲक्टिव्ह पदार्थ आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कस्टम व महसूल गुप्तचर विभागाने ही कारवाई केली आहे. जप्त केलेले कार्गाे कंटेनर्स धाेकादायक नसलेल्या श्रेणीत दाखविण्यात आले हाेते. मात्र, ते धोकादायकच होते. कंटेनर्समध्ये नेमके काेणते पदार्थ आहेत, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हे कंटेनर्स कराची येथून चीनच्या शांघाय बंदराकडे नेण्यात येत हाेते. मुंद्रा पाेर्ट किंवा भारतातील कुठल्याही पाेर्टवर ते अपेक्षित नव्हते. त्यामुळे ते या ठिकाणी कसे आले, याबाबत तपास करण्यात येत आहे.परदेशी मालवाहू नाैकेतून अनेक कंटेनर्स जप्त करण्यात आले. माहिती न देता धाेकादायक पदार्थांच्या वाहतुकीच्या संशयातून ते जप्त करण्यात आले हाेते. मुंद्रा पाेर्टवर सर्व कंटेनर्स उतरविण्यात आले असून, त्यांचा तपास करण्यात येत आहे.

यापूर्वी ३ हजार किलो ड्रग्स जप्तnमुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी ३ हजार किलोग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले हाेते. अफगाणिस्तानातून इराणमार्गे ते भारतात पाठवण्यात आले हाेते. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मोठी ड्रग्ज तस्करी करण्यात आली हाेती.

देशाच्या सुरक्षेला आम्ही कायमच प्राधान्य देऊआम्ही सीमाशुल्क विभाग आणि डीआरआयच्या या कारवाईत पूर्ण सहकार्य केले. तत्काळ कारवाईसाठी मदत केली. आम्ही त्यांच्या सतर्कतेला सलाम करतो. अदानी समूह राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला गंभीरपणे घेतो. त्याच्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, असे समूहाने निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानGujaratगुजरातDrugsअमली पदार्थ