रब्बीची पेरणी ३२ टक्क्यांवर थंडीची चाहूल : हरभराचे क्षेत्र सर्वाधिक
By admin | Updated: November 10, 2015 20:21 IST
जळगाव- थंडीची चाहूल लागली आहे. किमान म्हणजेच रात्रीचे तापमान दिवसागणिक कमी होत आहे. पहाटे बोचरी थंडी जाणवते. या अनुकूल वातावरणात रब्बी हंगामही जोर धरत आहे. आतापर्यंत रब्बी हंगामाची ३२ टक्के पेरणी झाल्याची माहिती आहे.
रब्बीची पेरणी ३२ टक्क्यांवर थंडीची चाहूल : हरभराचे क्षेत्र सर्वाधिक
जळगाव- थंडीची चाहूल लागली आहे. किमान म्हणजेच रात्रीचे तापमान दिवसागणिक कमी होत आहे. पहाटे बोचरी थंडी जाणवते. या अनुकूल वातावरणात रब्बी हंगामही जोर धरत आहे. आतापर्यंत रब्बी हंगामाची ३२ टक्के पेरणी झाल्याची माहिती आहे. सर्वाधिक पेरणी हरभरा या पिकाची झाली आहे. या पाठोपाठ मका, गव्हाची पेरणी झाली आहे. कमी पाण्यात येणार्या पिकांना पसंतीगव्हाला पाण्याची अधिक गरज असते. कृषि पंपांना फक्त सहा ते सात तास वीज मिळते. अधूनमधून वीजपुरवठा खंडित होतो. यातच पाण्याची उपलब्धता पुरेशी नसल्याने शेतकर्यांचा कल हरभरा, ज्वारी ही पिके घेण्याकडे आहे. थंडी वाढतीथंडी दिसागणिक वाढत आहे. रात्री १० वाजेनंतर गार वारे सुटतात. पहाटे बोचरी थंडी असते. दिवाळीनंतर गहू पेरणीस शेतकरी सुरुवात करतात. अर्थातच दिवाळसणानंतर थंडी वाढत असल्याने गव्हाच्या पेरणीला गती येते. पण आद्याप पेरणी करून पुढे क्षेत्र लवकर खाली करण्याच्या उद्देशाने गव्हाची पेरणी सुरू झाली आहे. आतापर्यंत आठ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. रात्रीच्या तापमानाची माहिती(तापमान सेंटीग्रेडमध्ये)३ नोव्हेंबर २०.६४ नोव्हेंबर १९.२५ नोव्हेंबर १९.४६ नोव्हेंबर १९.०७ नोव्हेंबर १८.६८ नोव्हेंबर१८.८९ नोव्हेंबर १९.०१० नोव्हेंबर१८.१रब्बी हंगामातील विविध पिकांची पेरणी(पेरणीचे आकडे हेक्टरमध्ये)ज्वारी- १८ हजार ३३२गहू- ८ हजार ६५९मका- १३ हजार ६३५हरभरा- १९ हजार १३६कोट-जसा थंडीचा जोर वाढेल तशी रब्बी हंगामातील पिकांची पेरणीही गती घेईल. हरभरा पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे. पुढे गव्हाची पेरणीदेखील वाढेल, असा अंदाज आहे. -पी.के.पाटील, कृषि उपसंचालक