शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लालूंना मिळालेली ही विशेष सुविधा मोदी सरकारकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 23:16 IST

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना मिळणा-या विशेष सुविधा रद्द करुन केंद्रातील मोदी सरकारने जोरदार दणका दिला आहे.

नवी दिल्ली, दि. 28 - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना मिळणा-या विशेष सुविधा रद्द करुन केंद्रातील मोदी सरकारने जोरदार दणका दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बिहारच्या राजकरणात अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुद्धा लालूप्रसाद यादव यांना दणका देत महाआघाडीतून बाहेर पडून थेट भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन पुन्हा सरकार स्थापन केले.  देशातील विमानतळांवर ३० प्रकारच्या व्हीआयपी श्रेणीतील व्यक्तींना विशेष सूट दिली जाते. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसारख्या लोकांचा समावेश असतो. या व्हीआयपींना एसपीजीची विशेष सुरक्षाही पुरवली जाते. याशिवाय त्यांना विमानापर्यंत जाण्यापर्यंत कोणत्याही सुरक्षेशिवाय ते विमानातही जाऊ शकतात. या सुविधेचा लाभ लालूप्रसाद यादव यांना सुद्धा मिळत होता. विशेष म्हणजे, या यादीत नाव समाविष्ट नसूनही गेल्या आठ वर्षांपासून पाटणा विमानतळावर लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना ही सुविधा पुरवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून लालूंना ही सुविधा काढून घेण्यात आली. 2009 मध्ये यूपीए सरकारच्या काळात लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना ही सुविधा देण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यात ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटीकडे (बीसीएएस) यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून ही सुविधा रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे, लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांमागे भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. बेनामी संपत्तीप्रकरणी आयकर विभागाने लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांची आधीच 180 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच, आयकर विभागाने त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, मनी लाँडरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  यावरुन लालूप्रसाद यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारने आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोपही केला आहे.