शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

गोपनीयता हा मूलभूत हक्क आहे की नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 22:13 IST

गोपनीयता हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे की नाही, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज चर्चा करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - गोपनीयता हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे की नाही, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज चर्चा करण्यात आली आहे. आधार कार्डला विविध योजनांसाठी सक्तीचं करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिका सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखाली काल 5 सदस्यीय खंडपीठाकडे सुनावणी झाली होती. त्यानंतर आज गोपनीयतेच्या मुद्द्यावर 9 जणांच्या खंडपीठाकडे पुन्हा सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखालील 9 जणांच्या खंडपीठाकडे सुरू असलेल्या सुनावणीला अ‍ॅड. गोपाल सुब्रह्मण्यम यांनी सुरुवात करून दिली. आयुष्य आणि स्वातंत्र्याचा अधिकाराचं पहिल्यापासूनच मूलभूत हक्कांमध्ये समावेश असल्याचंही सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सांगितले. मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखालील 9 जणांच्या या खंडपीठात जे. चेलामेश्वर, एस. ए. बोबडे, आर. के. अग्रवाल, आर. एफ. नरिमन, ए. एम. सप्रे, डी. वाय. चंद्रचुड, संजय किशन कौल आणि एस. ए. नजीर यांचा समावेश आहे. या प्रकरणावर सुनावणी सुरूच राहणार असून, लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा(मूलभूत अधिकारांप्रमाणे कर्तव्यपालनातही आग्रही राहा)
समाजात अनेक नागरिक आपल्या मूलभूत अधिकारांसाठी आग्रही राहतात. परंतु सर्वजण आपले कर्तव्य पार पाडण्यात आग्रही भूमिका घेत नाहीत. त्यामुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाऊन इतरांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे मूलभूत अधिकारांप्रमाणे कर्तव्यपालनातही नागरिकांनी आग्रही भूमिका घेण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांनी केले.

भूमाफिया पीडित जनआंदोलनाच्या वतीने हिंदी मोरभवन सभागृहात आयोजित सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे, माजी सहायक पोलीस आयुक्त रमेश मेहता, जनआंदोलनाचे अध्यक्ष दिलीप नरवडिया, अ‍ॅड. सुभाष काळबांडे, अ‍ॅड. राजेश नायक, रवी गाडगे पाटील उपस्थित होते. विकास शिरपूरकर म्हणाले, कोणताही गुन्हा पैसा, बाई आणि जमिनीच्या वादातून घडतो. रिकाम्या जागेचा ताबा घेण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून, त्याबाबतचा कायदा करण्याची गरज आहे. पुढील व्यक्ती आपल्यावर आक्रमण करीत नाही तोपर्यंत गप्प बसण्याची सर्वांना सवय आहे.