शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

इतरांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आम्हाला कशामुळे?, विद्यार्थ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 05:02 IST

सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने त्या विष

नवी दिल्ली : सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने त्या विषयांच्या फेरपरीक्षेचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. पेपरफुटीला आम्ही दोषी नाही, आम्ही वर्षभर अभ्यास करून परीक्षा दिली. मग काहींच्या गुन्ह्यांची शिक्षा आम्हाला का, असा सवाल ते करीत आहेत.या परीक्षेसाठी तारखांची घोषणा सोमवारी वा मंगळवारी होऊ शकते, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. पेपरफुटीप्रकरणी कोचिंग क्लासवर संशय असून, विकी या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य २५ जणांची चौकशी सुरू आहे.काही विद्यार्थ्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २६ मार्च रोजी सकाळी त्यांना लिफाफा मिळाला. त्यात बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरचे उत्तर होते. पोलिसांनी बारावी अर्थशास्त्र व दहावी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलिसात दिलेल्या तक्रारीत बोर्डाने म्हटले आहे की, त्यांना २३ मार्च रोजी अज्ञात ठिकाणाहून एक फॅक्स आला. राजेंद्रनगरमध्ये कोचिंग क्लास चालविणारी एक व्यक्ती पेपरफुटीत सहभागी आहे, असे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीत दोन शाळांची नावेही होती. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन केले. ‘आमच्या आयुष्याशी खेळू नका’ असे फलक ते झळकावत होते. या विद्यार्थ्यांनी असा दावा केला आहे की, जवळपास सर्वच पेपर परीक्षेच्या आदल्या दिवशी फुटले होते. त्यामुळे पुन्हा परीक्षा घ्यायची असल्यास सर्वच विषयांची घ्यावी. काही विद्यार्थ्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, दोन विषयांची पुन्हा परीक्षा घेण्याच्या घोषणेमुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत.मीही शांतपणे झोपू शकत नाही !पेपरफुटी प्रकरणात दोषींना सोडणार नाही, असे सांगतानाच मीही पालक आहे आणि असे घडल्याने निश्चिंत झोपू शकत नाही, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर गुरुवारी म्हणाले. या घटनेने सीबीएसईच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून परीक्षा व्यवस्थेत बदलासह सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटीमुळे ती परीक्षा पुन्हा होणार आहे. पालकांचा त्रास मी समजू शकतो. विद्यार्थ्यांची काय अवस्था होते याची मला जाणीव आहे, असेही त्यांनी सांगितले.त्याच राज्यात होणार परीक्षा?ज्या राज्यात प्रश्नपत्रिका लीक झाली त्याच राज्यात पुन्हा परिक्षा घेण्याचा विचार सध्या सुरू आहे. जर १० वी गणिताची परिक्षा पूर्ण देशात झाली तर, १६.३८ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परिक्षा द्यावी लागेल. पण, कमी विद्यार्थ्यांची जर पुन्हा परीक्षा झाली तर, याचे निकालही वेळेवर लागतील.

टॅग्स :CBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणCBSE Examsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा