स्वीकृत नगरसेवकांचा प्रश्न मार्गी परिवहन सदस्यांचीही निवड : शिवसेनेत निष्ठावंतांना डावलले
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
नवी मुंबई : दोन महिन्यांपासून रखडलेला स्वीकृत नगरसेवक व परिवहन सदस्यांचा विषय अखेर मार्गी लागला. सर्वसाधारण सभेने पक्षीय संख्याबळाप्रमाणे सदस्यांची निवड केली आहे. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यामुळे पदाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्वीकृत नगरसेवकांचा प्रश्न मार्गी परिवहन सदस्यांचीही निवड : शिवसेनेत निष्ठावंतांना डावलले
नवी मुंबई : दोन महिन्यांपासून रखडलेला स्वीकृत नगरसेवक व परिवहन सदस्यांचा विषय अखेर मार्गी लागला. सर्वसाधारण सभेने पक्षीय संख्याबळाप्रमाणे सदस्यांची निवड केली आहे. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यामुळे पदाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी मेच्या पहिल्या आठवड्यात अर्ज दाखल करण्यात आले होते. ९ मे रोजी पाच सदस्यांची निवड होणे आवश्यक होते. परंतु पाच जागांसाठी दहा जणांचे अर्ज असल्यामुळे ही निवड लांबणीवर पडली. जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये परिवहन सदस्यांची निवड होणार होती. परंतु ती सभा लांबणीवर पडल्याने सर्वच निवडी रखडल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या सभेमध्ये रखडलेले विषय मार्गी लागले. स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनंत सुतार, सूरज पाटील व घनश्याम मढवी यांची निवड केली आहे. शिवसेनेने राजेश शिंदे व मनोह हळदणकर यांची नियुक्ती केली आहे. परिवहन सदस्य म्हणून राष्ट्रवादीच्या साबू डॅनियल, वीरेश सिंग, प्रदीप गवस यांची तर शिवसेनेच्यावतीने विसाजी लोके, राजेंद्र आव्हाड यांची निवड केली आहे. काँगे्रसने रामचंद्र दळवी यांना संधी दिली आहे. शिवसेनेने पुन्हा एकदा निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले आहे. राजेश शिंदे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. शिंदे हे मूळचे राष्ट्रवादी काँगे्रसचे कार्यकर्ते. एक वेळ नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु नंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकून आरपीआयमध्ये प्रवेश केला. आरपीआयमधून ऐन निवडणुकीमध्ये थेट शिवसेनेमध्ये प्रवेश केला व मोठ्या फरकाने पराभूत झाले. तीन वर्षांत तीन पक्ष बदलणार्यांना सेनेने स्वीकृत नगरसेवक केले. पालिका निवडणुकीमध्ये फक्त तीन मतांनी पराभूत झालेल्या समीर बागवान यांचे नाव आघाडीवर होते. त्यांना संधी मिळणार हे जवळपास नक्की झाले होते. परंतु अखेरच्या क्षणी त्यांचे नाव कापण्यात आले व विसाजी लोके, राजेंद्र आव्हाड यांना संधी देण्यात आली. यामुळे शिवसेनेमधील अनेक पदाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चौकटनाहटा समर्थकांचे पंख कापलेसमीर बागवान हे विजय नाहटा यांचे जवळचे मानले जातात. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी नाहटा यांच्या प्रचार सभांचे नियोजन, सर्व परवानग्या व इतर कामे चोखपणे केल्यामुळे त्यांचे संघटनेमधील महत्त्व वाढले होते. स्वत: नाहटा यांनी त्यांचे नाव परिवहनसाठी सुचविले होते. परंतु दुसरीकडे सानपाडामधील विसाजी लोके यांना परिवहन सदस्य करणारच असा पण नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी केल्याची चर्चा होती. त्यांनी पालकमंत्र्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली होती. वास्कर त्यांच्या विभागातील पदाधिकार्यांची वर्णी लावण्यात यशस्वी झाले असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. पण दुसरीकडे नाहटा समर्थकांचे पंख कापले जात असल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे.