शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: प्रेयसीला भेटण्यासाठी क्वारंटिन सेंटरमधून पळाले; दारू, गांजा घेऊन परत आले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 07:09 IST

मणिपूरमधील घटना; क्वारंटाईन सेंटरमधून पलायन

गुवाहाटी : मणिपूर येथील तामेंगलाँग येथे क्वारंटाइनमध्ये ठेवलेले दोन युवक तिथून पलायन करून आपापल्या प्रेयसींना भेटायला गेले. त्यानंतर क्वारंटाइन केंद्रामध्ये परत येताना त्या दोघांनी आपल्यासोबत दारू, सिगरेट, गांजा आणला व त्याची विक्री तेथील रुग्णाला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या गोष्टीला अखेर वाचा फुटून सरकारी यंत्रणेने चौकशी सुरू केली आहे. क्वारंटाइनमधून पळून गेल्यानंतर या युवकांनी आपापल्या प्रेयसींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या घरून आपल्या बाईकही क्वारंटाइन केंद्रामध्ये आणल्या. या केंद्रात एका रुग्णाला हवी असलेली गांजा, सिगरेटची चार पाकिटे त्याला या युवकांनी दिली. नेमके त्याच वेळी सरकारी अधिकाऱ्यांनी या युवकांना रंगेहाथ पकडले. हे युवक कोरोनाचे संशयित रुग्ण असल्याने कोणीही त्यांना हात लावण्याची तसेच मारहाण करण्याचीही हिंमत केली नाही. कोरोनाच्या साथीमुळे सध्या सगळे तुरुंग बंदच असल्यामुळे या दोन युवकांना अटक करून तिथे धाडण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.कोरोना साथीसारख्या भयानक आजारातून बरे होण्यासाठी रुग्णांना क्वारंटाइनमध्ये ठेवले जाते. मात्र त्या उद्देशाला या दोन युवकांनी वाईट कृत्ये करून हरताळ फासला, असे मत सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. (वृत्तसंस्था)क्वारंटाईन केंद्रातील सारेच झाले अचंबितक्वारंटाइन केंद्रामध्ये गैरव्यवस्था असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. पण मणिपूरमध्ये दोन युवकांनी क्वारंटाइन केंद्रामध्ये केलेल्या प्रकारामुळे सारेच अचंबित झाले आहेत. व्यसनाधीन लोकांची लॉकडाऊनच्या काळात पंचाईत झाली आहे. अशा मंडळींना कोरोनाची लागण झाली तर त्यांचा जीव आणखी कासावीस होतो आणि आपल्याला हव्या त्या वस्तू मिळविण्यासाठी ते वाट्टेल ते कृत्य करतात. त्याचीच झलक मणिपूरच्या क्वारंटाइन केंद्रात दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या