शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्युरी, केचअपची मागणी वाढली, टॉमेटॉ महाग झाल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:55 IST

टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यामुळे टोमॅटो प्युरी आणि केचअपच्या मागणीत ४0 ते ४५ टक्के वाढ झाल्याचे असोचेमने म्हटले आहे.

मंगळूर : टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यामुळे टोमॅटो प्युरी आणि केचअपच्या मागणीत ४0 ते ४५ टक्के वाढ झाल्याचे असोचेमने म्हटले आहे. भारतीय स्वयंपाकात टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. टोमॅटो महागल्यामुळे लोक पर्याय म्हणून टोमॅटो प्युरी आणि केचअपकडे वळले आहेत, असे आढळून आले आहे.एक किलो टोमॅटोचे दर सध्या १00 रुपयांच्या घरात असल्याने, ते सामान्यांना परवडेनासे झाले आहेत. त्यामुळे लोकांनी आपला मोर्चा टोमॅटो प्युरी आणि केचअपकडे वळविला. दिल्ली-एनसीआर, मुंबई, लखनौ, कोलकता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद येथील बाजाराचा कानोसा घेतला असता, असे आढळून आले की, टोमॅटोच्या किमती इतक्यात कमी होण्याची शक्यता नाही. अनेक राज्यांत पुरामुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आवक वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाव लगेचच कमी होणे अशक्य असल्याचे बाजारातील जाणकारांनी सांगितले.कांदा आणि बटाटे अनेक दिवस साठवून ठेवता येऊ शकतात. टोमॅटोंचे मात्र, तसे नाही. टोमॅटो आठवडाभरापेक्षा जास्त काळ टिकू शकत नाहीत. त्यामुळे शेतातून काढलेले ताजे टोमॅटो स्वयंपाकघरात वापरले जातात. अत्याधुनिक शीतगृहे आणि वखारीतूनच त्यांची साठवणूक केली जाऊ शकते. या साठवणुकीमुळे किमती आणखी वाढतात. कारण साठवणुकीचा खर्च खूप अधिक असतो. यावर मात करण्यासाठी लोक टोमॅटो प्युरी आणि केचअपकडे वळले आहेत. (वृत्तसंस्था)

हॉटेलांतील डिशेसचे दरही वाढले-असोचेमने म्हटले आहे की, मागणी वाढल्यामुळे दुकानदारांनी प्युरी आणि केचअपचे साठे वाढविले आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या रश्श्यांत टोमॅटो वापरला जातो.च्हॉटेले आणि रेस्टॉरंट्समध्येही टोमॅटोला प्रचंड मागणी असते. टोमॅटो महागल्यामुळे हा सगळा ग्राहक वर्ग प्युरी आणि केचअपकडे वळला आहे. त्याबरोबर, हॉटेलांतील डिशेसचे दरही महागले आहेत.पुरवठा साखळीकडे लक्ष द्यावे-फळे आणि भाज्यांच्या किमतींतील सततचे चढउतार लक्षात घेऊन, सरकारने पुरवठा साखळीकडे लक्ष द्यायला हवे. शीतगृहांची निर्मिती करायला हवी.- डी. एस. रावत, असोचेमचे महासचिव