शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब पोलिसांनी अरविंद केजरीवालांची सुरक्षा काढली; दिल्ली पोलीस, निवडणूक आयोगाचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 21:31 IST

पंजाबमध्ये आपच्या पक्षाचे सरकार आहे. यामुळे आपचे प्रमुख असल्याने केजरीवाल यांना पंजाब सरकारने सुरक्षा पुरविली होती.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंजाब पोलिसांनी दिलेली सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. आज प्रचारावेळी केजरीवालांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यामुळे निवडणूक आयोग व दिल्ली पोलिसांनी आक्षेप घेतल्याने ही सुरक्षा काढून घेण्यात आल्याचे पंजाबच्या पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पंजाबमध्ये आपच्या पक्षाचे सरकार आहे. यामुळे आपचे प्रमुख असल्याने केजरीवाल यांना पंजाब सरकारने सुरक्षा पुरविली होती. वेळोवेळी केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमक्या येत असतात. आम्ही त्या संबंधीत एजन्सीना देत असतो. निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही पंजाब पोलिसांची सुरक्षा मागे बोलविली आहे. आम्ही त्यांना आमच्या चिंता सांगितल्या आहेत. सुरक्षा काढली असली तरी आम्ही त्यांच्या संपर्कात राहणार. तसेच दिल्ली पोलिसांना आम्हाला समजलेल्या घटना कळवत राहणार असे, पंजाब पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले. 

तर दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आलेली आहे. त्यांना दुसऱ्या राज्याचे संरक्षण मिळू शकत नाही, तसेच दुसरे राज्य संरक्षण देऊ शकत नाही. जर दुसऱ्या राज्यातील व्हीव्हीआयपी आले आणि त्याच्यासोबत सुरक्षा असेल, तर त्यांनाही ते फक्त ७२ तासांसाठी सुरक्षा देऊ शकतात. त्यासाठी दिल्ली पोलिसांनाही माहिती द्यावी लागते, असे म्हणाले. 

आता ऐन दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांची सुरक्षा काढण्यास लावल्याने प्रचारात हा मुद्दाही कळीचा ठरणार आहे. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. ते राज्याच्या ताब्यात द्या असे केजरीवाल अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, दोन एस्कॉर्ट्स, वॉचर्स, सशस्त्र रक्षक आणि शोध कर्मचारी असे सुमारे ६० सुरक्षा कर्मचारी मिळतात.गृहमंत्रालयाची यामागे मोठी भूमिका आहे. दिल्ली पोलिसांना पत्र लिहून केजरीवाल जेव्हा जेव्हा दिल्लीत असतील तेव्हा पंजाब पोलिसांची सुरक्षा स्वीकारण्याचा प्रस्ताव स्वीकारू नये असे कळविण्यात आले आहे. यावरून आता ही घडामोड घडली आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाब