शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे वय १८ ते २१ वर्षे आहे... मग ‘लिव्ह इन’मध्ये राहू शकता: पंजाब हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 06:02 IST

उच्च न्यायालयाचे हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०१८ च्या निर्णयाशी संबंधित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात सध्या मुलींच्या लग्नाचे किमान वय वाढवण्याची चर्चा सुरू आहे. मुलींचे विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्याचे विधेयक संसदेत मांडण्यातही आले आहे.  मात्र  पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा कोणताही प्रौढ तरुण विवाह करू शकत नसला तरी तो १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रीच्या संमतीनंतर तिच्यासोबत राहू शकेल.

याचाच दुसरा अर्थ की १८ वर्षांवरील पुरुष वा स्त्री एकमेकांशी विवाह करू शकत नाही. पुरुषांच्या बाबतीत विवाहाचे वय आधीपासून २१ आहे. संसदेने विधेयक संमत केल्यास स्त्रियांच्या बाबतीतही तो निर्णय लागू होईल.  पण १८ ते २१ वयोगटामधील स्त्री व पुरुषांना परस्पर सहमतीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मात्र राहता येईल. एकमेकांशी विवाह न करता या वयाचे तरुण व तरुणी एकमेकांसह राहण्यास पंजाब व हरयाणा न्यायालयाच्या एका निर्णयामुळे संमतीच मिळाली आहे. 

उच्च न्यायालयाचे हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०१८ च्या निर्णयाशी संबंधित आहे. कोणत्याही प्रौढ व्यक्ती (१८ वर्षांपेक्षा अधिक वय) विवाह न करता एक दांपत्य म्हणून राहू शकतात, असे सर्वोच्च  न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते.

त्यांना मिळाले संरक्षण

- आपल्या लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे कुटुंबीयांकडून आपल्या जिवाला धोका आहे, असे त्या दोघांनी याचिकेमध्ये म्हटले होते. तसेच त्यांचे कुटुंबीय त्यांची हत्या करतील, अशी भीती त्यांना वाटत असल्याचे वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. - आता त्यांचे लिव्ह इन रिलेशनशिपमधील संबंध न्यायालयानेच मान्य केले आहेत. त्यामुळे मुलगी १८ वर्षांची, म्हणजेच २१ वयाखालील असली तरी तिलाही त्या मुलासह एकत्र राहण्याचा अधिकार मिळाला आहे. पोलीसही त्यांना आता त्रास देणार नाहीत. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय