शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Captain Amarinder Singh: पंजाबमध्ये राजकीय भूकंप; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 17:08 IST

सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबमध्ये मोठ्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट शब्दात अपमान सहन करणार नाही असं म्हटलं आहे.

चंडीगढ – पंजाबकाँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप घडला आहे. याठिकाणी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंग यांच्यासोबत २० आमदार आणि पंजाबचेकाँग्रेसचे काही खासदार राजभवनला उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसच्या हायकमांडवर नाराज आहेत. आगामी काळात काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर संध्याकाळी कांग्रेस आमदारांची बैठक पार पडणार आहे. त्यात नव्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. पंजाब मुख्यमंत्र्याचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल सांगितले की, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग पत्रकार परिषद घेणार होते. मुख्यमंत्रिपदावरुन राजीनामा दिल्यानंतर कॅप्टम अमरिंदर सिंग हे काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबमध्ये मोठ्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट शब्दात अपमान सहन करणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंह काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना फोन करून AICC द्वारे विश्वासात न घेता काँग्रेस आमदारांची बैठक बोलवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पक्षात अशाप्रकारे अपमानास्पद वागणूक दिली जात असेल मुख्यमंत्रिपदी राहण्याची इच्छा नाही असं त्यांनी सांगितले.

राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, ज्यांच्यावर हायकमांडला भरवसा आहे त्यांना पंजाबचं मुख्यमंत्री करावं. माझ्यावर नेतृत्वाचा विश्वास नाही असं मला वाटतं. सध्या मी काँग्रेसमध्येच आहे आणि भविष्यात योग्य वेळी निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी