शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा! 'या' राज्यात 41 टक्के दुधाचे नमुने फेल, आता सुक्या मेव्याच्या गुणवत्तेची होतेय तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 11:49 IST

milk samples : राज्यात सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात असुरक्षित दुधाचा वापर आणि मिठाई सजवण्यासाठी चांदी वर्कच्या नावाखाली अ‍ॅल्युमिनियमचेही वर्क बाजारात विकली जातात. यामुळे प्रशासनासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

चंडीगड :  सणासुदीच्या दिवसांत दरवर्षी दुधामध्ये भेसळ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. पंजाबमध्ये सणासुदीच्या काळात आतापर्यंत घेण्यात आलेल्या दुधाचे 41 टक्के नमुने फेल झाले आहेत. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तयार केलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या दोन महिन्यांत 676 दुधाचे नमुने गोळा करण्यात आले असून, त्यापैकी 278 असुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. यादरम्यान, प्रशासन सुक्या मेव्याच्या दर्जाचीही तपासणी करत आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात असुरक्षित दुधाचा वापर आणि मिठाई सजवण्यासाठी चांदी वर्कच्या नावाखाली अ‍ॅल्युमिनियमचेही वर्क बाजारात विकली जातात. यामुळे प्रशासनासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

मिठाई सजवण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणार्‍या शुद्ध चांदीच्या वर्कऐवजी अॅल्युमिनियमचे वर्क केला जातो, हे देखील आरोग्यासाठी एक मोठे आव्हान बनले आहे. या महिन्यात चांदीच्या वर्कची गुणवत्ता तपासण्यासाठी राज्यभरात 164 नमुने घेण्यात आले आहेत. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळा केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासले जात असले तरी, गोळा केलेले अनेक नमुने चांदीऐवजी अॅल्युमिनियमचे होते. तज्ज्ञांच्या मते, अॅल्युमिनियमचे सेवन आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मानकांनुसार, अॅल्युमिनियमचा वापर मानवी वापरासाठी असुरक्षित आहे.

एफडीएने सुकामेव्याच्या गुणवत्तेच्या चाचणीवरही विशेष भर दिला आहे. यासाठी आतापर्यंत 100 हून अधिक नमुने घेण्यात आले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण निकषांचे पालन करून त्यांनी सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी चांदीचे कागद, दूध आणि सुक्या मेव्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती, असे पंजाबचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. अभिनव त्रिखा यांनी सांगितले. तसेच, ऑगस्टमध्ये आम्ही दूध भेसळीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एक आठवड्याची विशेष मोहीम सुरू केली होती आणि प्रत्येक जिल्ह्यात दररोज दुधाचे किमान पाच नमुने घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते, असेही डॉ. अभिनव त्रिखा यांनी सांगितले.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा