पुणतांब्याचा तलाव कोरडा पुणत्
By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST
ाांबा :
पुणतांब्याचा तलाव कोरडा पुणत्
ाांबा : साठवण तलाव कोरडा पडल्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गोदावरीच्या कालव्याचे आवर्तन कधी सुटणार हे निश्चित नसल्यामुळे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. आठवडाभरापासून तलाव कोरडा पडल्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महिलांवर आली आहे. पुणतांब्याचा पाणी प्रश्न सोडविण्यात ग्रामपंचायतीचे सत्ताधारी मंडळी अपयशी ठरले आहेत. पाणी प्रश्नाचे ग्रहण केव्हा सुटणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वाढती लोकसंख्या, गळक्या जलवाहिन्या, साठवण तलावाची अपुरी क्षमता यामुळे पाणी टंचाई जाणवते. ग्रामपंचायत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रस्तापूर येथील विहिरीजवळ कूपनलिका घेऊन पाणी पुरवठा करणार आहे. पर्यायी पाणी योजनेवर पुणतांबेकरांची तहान भागणार का? हा प्रश्न आहे. पाणी टंचाईबाबत पंचायत समितीने उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)पंचायतीमुळे पाणीटंचाईपुणतांबा: धनवटेंचा आरोपपुणतांबा : ग्रामपंचायतीमुळेच पुणतांब्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. धनंजय धनवटे यांनी केला.ऐन उन्हाय्यात पुणतांबेकरांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यास ग्रामपंचायत जबाबदार आहे. गेल्या ८ दिवसांपासून साठवण तलाव कोरडा पडला आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. साठवण तलावात मुबलक पाणी असताना ग्रामपंचायतीने नियोजन केले नाही. राजकीय हितसंबंध जपण्यासाठी साठवण तलावाशेजारी विहिरी अधिग्रहणासाठी कार्यवाही केली नाही. गावातील तीव्र पाणी टंचाईकडे आमदार स्नेहलता कोल्हे यांचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप धनवटे यांनी केला. (वार्ताहर)