शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'हे' आहेत देशासाठी वीरमरण पत्करणारे जवान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 23:19 IST

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला.

नवी दिल्ली- दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारत मातेच्या 40 जवानांना वीरमरण आले आहे. केंद्रीय राखीव दलाचे जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यानंतर पूर्ण भारत देश शोकसागरात बुडाला आहे. दहशतवादी संघटना असलेल्या जैश-ए-मोहम्मदनं पूर्वनियोजित कट आखून जवानांना लक्ष्य केलं आहे. परंतु अद्यापही अनेक शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अधिकृतरीत्या देशासाठी वीरमरण झालेल्यांची माहिती मिळालेली नाही.शहीद जवानांमध्ये कोणाचा तरी भाऊ, कोणाचा पती आणि कोणाच्या तरी मुलाचाही समावेश आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना वीरमरण आलं. यामध्ये आसाम (1), बिहार (2), हिमाचल प्रदेश (1), जम्मू-काश्मीर (1), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1), मध्य प्रदेश (1), महाराष्ट्र (2), ओदिशा (2), पंजाब (4), राजस्थान (5), तमिळनाडू (1), उत्तर प्रदेश (12), उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे. 

  • ही आहेत शहीद जवानांची नावं  

1. राठोड नितीन शिवाजी 

2. भागिरथी सिंग 

3.  वीरेंद्र सिंग 

4. अवधेश कुमार यादव 

5. रतन कुमार ठाकूर 

6. पंकज कुमार त्रिपाठी 

7. जीत राम 

8. अमित कुमार 

9. विजय कुमार मौर्य 

10. कुलविंदर सिंग 

11. मनेश्वर बासुमतारी 

12. मोहन लाल 

13. संजय कुमार सिन्हा 

14. राम वकील 

15. नसीर अहमद 

16. जैमल सिंग 

17. सुखविंदर सिंग 

18. टिलक राज 

19. रोहिताश लांबा 

20. विजय सोरेंग 

21. वसंता कुमार व्ही. व्ही 

22. सुब्रमण्यम जी.  

23. गुरू एच.  

24. मनोज बेहरा 

25. नारायल लाल गुरजार 

26. महेश कुमार 

27. प्रदीप कुमार 

28. हेमराज मीना 

29. पी. के. साहू 

30. रमेश यादव 

31. संजय राजपूत 

32. कौशल कुमार रावत 

33. प्रदीप सिंग 

34. श्याम बाबू 

35. अजित कुमार आझाद 

36. मनिंदर सिंग अत्री 

37. बब्लू संतरा 

38. अश्वनी कुमार कोची 

39. शीवचंद्रन

40. सुदीप बिश्वासकाल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 38 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला