शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 7 जण ताब्यात, 'हा' असू शकतो मास्टरमाइंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 16:21 IST

पुलवाम्यात दहशतवादी हल्ल्यात भारतमातेचे 40 जवान शहीद आहे.

नवी दिल्ली- पुलवाम्यात दहशतवादी हल्ल्यात भारतमातेचे 40 जवान शहीद आहे. त्यानंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सात लोकांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतीपुरा जिल्ह्यांतील असून, त्यांच्यावर पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला मदत केल्याचा संशय आहे.हल्ल्याची योजना 'जैश-ए-मोहम्मद'चा पाकिस्तानी म्होरक्‍या कामरान याने केल्याचा संशय असून, तो पुलवामा, अवंतीपुरा अन् त्राल या भागात सक्रिय आहे. त्राल जवळच्या मिदुरा येथून या हल्ल्याचा कट शिजल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके पुरवणाऱ्या दहशतवाद्याचा पोलीस शोध घेत आहेत. 

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारत मातेचे 40 जवान शहीद झालेत. केंद्रीय राखीव दलाचे जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. शहीद जवानांमध्ये कोणाचा तरी भाऊ, कोणाचा पती आणि कोणाच्या तरी मुलाचाही समावेश आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आलं. यामध्ये आसाम (1), बिहार (2), हिमाचल प्रदेश (1), जम्मू-काश्मीर (1), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1), मध्य प्रदेश (1), महाराष्ट्र (2), ओदिशा (2), पंजाब (4), राजस्थान (5), तमिळनाडू (1), उत्तर प्रदेश (12), उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला