शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशचे 12 जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 19:27 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील 12 जवान शहीद झाले आहेत. येथील 12 जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  

ठळक मुद्देपुलवामा दहशतवादी हल्ल्यात 38 जवान शहीदहल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल, सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य - नरेंद्र मोदी

लखनौ - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील 12 जवान शहीद झाले आहेत. येथील 12 जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  राज्य सरकारकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.  

चंदौलीतील अवधेश कुमार यादव, अलाहाबादमधील महेश कुमार, शामलीतील प्रदीप कुमार, शामलीतील अमित कुमार,वाराणसीतील रमेश यादव, आग्रातील कौशल कुमार यादव,  उन्नावमधील अजीत कुमार, कानपूरमधील श्याम बाबू, कन्नौजमधील प्रदीप सिंह, देवरियातील विजय मौर्य हे जवान पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेत.

 

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारत मातेचे 38 जवान शहीद झालेत. केंद्रीय राखीव दलाचे जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारत देश शोकसागरात बुडाला आहे. दहशतवादी संघटना असलेल्या जैश-ए-मोहम्मदनं पूर्वनियोजित कट आखून जवानांना लक्ष्य केलं आहे. परंतु अद्यापही अनेक शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अधिकृतरीत्या देशासाठी वीरमरण झालेल्यांची माहिती मिळालेली नाही.शहीद जवानांमध्ये कोणाचा तरी भाऊ, कोणाचा पती आणि कोणाच्या तरी मुलाचाही समावेश आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना वीरमरण आलं. यामध्ये आसाम (1), बिहार (2), हिमाचल प्रदेश (1), जम्मू-काश्मीर (1), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1), मध्य प्रदेश (1), महाराष्ट्र (2), ओदिशा (2), पंजाब (4), राजस्थान (5), तमिळनाडू (1), उत्तर प्रदेश (12), उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे. 

तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला.  

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश ए मोहम्मदMartyrशहीद