शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: जगभरात निषेध; मदत करण्याची पुतिन यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 05:50 IST

दहशतवादाविरोधात भारताने आपली लढाई सुरू ठेवावी, तिला संपूर्ण सहकार्य व आवश्यक ती मदत करायला आम्ही तयार आहोत, असे रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी तीव्र निषेध केला आहे. रशिया, अमेरिका,फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इस्राईल, चेकोस्लावाकिया, तुर्कस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान आदी देशांनी हल्ल्याविषयी चिंता व्यक्त करताना, भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला कायमच पाठिंबा असल्याची ग्वाही दिली आहे.दहशतवादाविरोधात भारताने आपली लढाई सुरू ठेवावी, तिला संपूर्ण सहकार्य व आवश्यक ती मदत करायला आम्ही तयार आहोत, असे रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही जवानांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी वा पुतिन यांनी थेट पाकिस्तानचे नाव घेण्याचे मात्र टाळले आहे. चीननेही या हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र, चीनच्या संदेशातही पाकिस्तानचे नाव घेण्यात आलेले नाही, तसेच जैश-ए-मोहम्मदचा सूत्रधार अझहर मसूद याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याला विरोध असल्याचे चीनने पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे.फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांड्रे झिगलर यांनी अतिरेकी हल्ल्याचा फ्रान्स निंदा करत आहे, असे म्हटले आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईला फ्रान्सचा कायमच पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले. नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका व मालदीव यांनीही दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तुर्कस्तान, चेकोस्लावाकिया, आॅस्ट्रेलिया, इस्राईल, जर्मनी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला