शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

पुलवामा हल्ल्यात मोठा गौप्यस्फोट, CRPFच्या बसवर हल्ल्यापूर्वी झाली होती दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 5:16 PM

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे सापडण्यास सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे सापडण्यास सुरुवात झाली आहे. आजतकच्या प्रतिनिधीनं हल्ल्याप्रसंगी घटनास्थळावर असलेल्या जवानांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती सापडली आहे. पुलवामा हल्ला प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. एका जवानानं सांगितलं की, स्फोटाच्या पूर्वी वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या बसवर काही अज्ञातांनी दगडफेक केली होती. त्याच्या 10 मिनिटांनंतरच स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या बसला धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला.तर दुसऱ्या एका जवानानं सांगितलं की, त्या स्फोटाचा आवाज अजूनही आमच्या डोक्यातून जात नाही आहे. आम्ही सकाळी एकत्र निघालो होतो. जेवणही एकत्रच झालं होतं. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही हल्ला झाला त्या ठिकाणी आलो आणि अचानक ती कार बसवर आदळली आणि स्फोटकांचा स्फोट झाला. त्यानंतर अनेक जवानांना वीरगती प्राप्त झाली होती, तर इतर जखमी जवानांना आम्ही तात्काळ रुग्णालयात हलवले. आता आम्ही निष्ठेनं कर्तव्य बजावणार असून, दहशतवाद्यांचा योग्य बदला घेऊ, असंही या जवानांनी सांगितलं आहे. हल्ला झाला त्यावेळी बसचा वेग कमी होता. ज्या बसला लक्ष्य करण्यात आलं ती बुलेट प्रूफ नव्हती. एनआयएची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून, हल्ल्याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला