शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: सर्व विरोधी पक्ष लष्कर,केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 05:35 IST

पुलवामा हल्ला हा भारताच्या अस्मितेवर घाला आहे. अशा कठीण समयी देशातील सर्व विरोधी पक्ष हे लष्कर व केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ला हा भारताच्या अस्मितेवर घाला आहे. अशा कठीण समयी देशातील सर्व विरोधी पक्ष हे लष्कर व केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी त्यांच्यासमवेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, ए. के. अ‍ॅन्टोनी हेही उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की, भारतीय लष्कर, नागरिकांवर होणारे दहशतवादीहल्ले हे अतिशय घृणास्पद कृत्य आहे. या देशात फूट पाडण्याचा दहशतवाद्यांचा इरादा आहे. त्यासाठी त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी हे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत. दहशतवाद्यांनी आजवर केलेले हल्ले जनता कधीच विसरणार नाही.कारवाईसाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचे केंद्राने जाहीर केले आहे. त्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, सारा देश शोकसागरात बुडालेला आहे. अशा वेळी लष्कर व केंद्र सरकारच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. पुलवामा हल्ल्यात आपले जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा वेळी त्यांच्यासोबत असणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, ते आम्ही पार पाडत आहोत. या हल्ल्यासंदर्भातील इतर पैलूंवर काँग्रेस पक्ष येत्या काही दिवसांत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. पुलवामा हल्ला करणाऱ्यांना मुँहतोड जवाब देण्याची मागणी काही राजकीय नेत्यांनी केली आहे. त्याविषयी राहुल गांधी म्हणाले की, मी या गोष्टीबाबत काहीच प्रतिक्रिया देणार नाही. हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक व्यथित झाला आहे. संतापला आहे.कठोरपणे मुकाबला हवा : मनमोहन सिंगमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, दहशतवादी कृत्यांचा कठोरपणेच मुकाबला केला पाहिजे. त्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे. देशाचे ऐक्य कायम राखले पाहिजे. गुलाम नबी आझाद म्हणाले की, पुलवामामधील घातपात हा देशावर झालेला हल्ला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला