स्रेहा मोरे, (संत नामदेव नगरी) :८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाकडे मोठ्या प्रकाशकांनी पाठ फिरवल्याने साहित्यरसिकांची निराशा झाली आहे. त्यामुळे घुमानमधील साहित्यप्रेमींना मराठीतील दर्जेदार साहित्याला मुकावे लागले आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनात केवळ छोट्या-छोट्या प्रकाशकांनी सहभाग घेतल्याने प्रसिद्ध प्रकाशकांची नाराजी कायम असल्याचे दिसून आले. या ग्रंथप्रदर्शनात ग्रंथाली प्रकाशन, लिमये प्रकाशन, महानुभाव प्रकाशन, चपराक प्रकाशन, अक्षरमानव प्रकाशन, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन, शब्द प्रकाशन, मराठी भाषा विकास परिषद आणि लोकराज्य अशा काही संस्थांनी सहभाग घेतला आहे. तसेच, या प्रदर्शनात भास्कर हांडे यांच्या दुर्गचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनस्थळ निश्चित झाल्यानंतर आयोजक आणि प्रकाशकांमध्ये वाद रंगला होता. त्यानंतर संमेलनाची तयारी जसजशी अखेरीस आली, त्यावेळी हा वाद संपुष्टात सांगण्यात आले. पंरतु, प्रत्यक्षात मात्र प्रकाशकांनी आपली भूमिका कायम राखत संमेलनावर बहिष्कार टाकल्याचे दिसून आले.
प्रकाशकांची पाठ
By admin | Updated: April 4, 2015 00:08 IST