नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिकारी व कर्मचारी उद्या, मंगळवारी एक दिवसाचा संप करणार असून, त्यामुळे या सर्व बँका बंद राहतील. खासगी व सहकारी क्षेत्रातील बँका सुरूच राहणार आहेत.फारसा खोळंबा होणार नाही...बँकांच्या विलीनीकरणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात कर्मचारी व अधिका-यांच्या संघटनेने एक दिवस लाक्षणिक संपाचे आवाहन केले आहे. सरकारी बँका बंद राहणार असल्या तरी एटीएम केंद्रे सुरूच राहतील. त्यामुळे ग्राहकांचा फारसा खोळंबा होण्याची शक्यता नाही.
सरकारी बँकांमध्ये आज संप, खासगी व सहकारी क्षेत्रातील बँका सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 06:10 IST