शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्ण वैमानिकाने २०० प्रवाशांचा जीव घातला धोक्यात

By admin | Updated: September 2, 2016 08:11 IST

अचानक वैमानिकाचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे विमानातील २०० प्रवाशांसह क्रू सदस्यांचे जीव धोक्यात आल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २ - विमान उड्डाणवस्थेत असताना अचानक वैमानिकाचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे विमानातील २०० प्रवाशांसह क्रू सदस्यांचे जीव धोक्यात आल्याची घटना समोर आली आहे. २८ एप्रिल रोजी एअर इंडियाच्या बोईंग ७८७ या दिल्ली-पॅरिस विमान प्रवासात प्रवाशांना या धक्कादायक अनुभवातून जावे लागले. 
 
या घटनेच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सदर वैमानिकाला मानसोपचारांची गरज असून, त्याने सहवैमानिक म्हणून सहा महिने काम करावे असा निष्कर्ष काढला आहे.  सहा महिन्यांच्या कालावधीत या वैमानिकाची वर्तणूक तपासावी असे या समितीने म्हटले आहे. 
 
सध्या या वैमानिकाला विश्रांती देण्यात आली असून, एअर इंडियाने या घटनेच्या तपासासाठी आणखी एक समिती नियुक्ती केली असून, ती समिती या वैमानिकाला क्लीनचीट देण्याची शक्यता आहे. २८ एप्रिलला सदर वैमानिकाने विमानातील संगणक व्यवस्थेशी छेडछाड केली आणि विमानाला क्षमतेपेक्षा जास्त उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. 
 
विमानाला क्षमतेपेक्षा जास्त उंचीवर नेले तर, विमान अस्थिर होते. फ्लाईट कंट्रोलकडून कुठलीही मदत मिळत नाही. मुख्य वैमानिकाने विमानाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करताच सहवैमानिकाने आक्षेप घेतला. पण त्याने सहवैमानिकाचा सल्ला धुडकावून उंची वाढवली. सुदैवाने नंतर विमान सुरक्षित उंचीवर आणल्याने धोका टळला. सहवैमानिकाने वरिष्ठांना या घटनेची माहिती दिल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली.