नाशिक : भारत संरक्षण उत्पादनांमध्ये ६५ टक्के स्वयंपूर्ण असून या क्षेत्रातील उत्पादनांमध्ये देशाला शंभर टक्के आत्मनिर्भर बनवण्याचे ध्येय असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी नाशिकमध्ये केले. ओझर येथील एचएएलमध्ये बांधणी झालेल्या स्वदेशी तेजस या लढाऊ विमानाच्या देशार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
गगनभेदी गर्जनेसह ‘स्वदेशी तेजस’ने हवेत उड्डाण घेताच टाळ्यांच्या आकाशभेदी कडकडाटाने लढाऊ विमानांच्या निर्मितीतील आत्मनिर्भरतेच्या हुंकाराचाच प्रत्यय नाशिक एचएएलच्या भूमीवरून जगाला दिला. एचएएलमधील तेजस आणि एचटीटी ४० या दोन स्वदेशी विमानांनी उड्डाण घेताच हजारो कंठांमधून झालेला जल्लोष हा भारताला संरक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसह लढाऊ विमाने निर्यातदारांच्या पंक्तीत नेऊन ठेवण्याचे प्रतीक ठरला. सुखोई- ३० या विमानाच्या हवाई कसरतींची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पणसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘एलसीए एमके-१ए’ च्या तिसऱ्या आणि ‘एचटीटी ४० एअरक्राफ्ट’ च्या दुसऱ्या मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे देशार्पण झाले.
Web Summary : Defense Minister Rajnath Singh dedicated the indigenous Tejas fighter jet to the nation in Nashik, emphasizing India's self-reliance in defense production and its goal of complete आत्मनिर्भरता. स्वदेशी विमानांचे प्रदर्शन and Sukhoi-30 aerobatics highlighted India's growing capabilities.
Web Summary : रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने नासिक में स्वदेशी तेजस लड़ाकू विमान को राष्ट्र को समर्पित किया, रक्षा उत्पादन में भारत की आत्मनिर्भरता और पूर्ण आत्मनिर्भरता के लक्ष्य पर जोर दिया। स्वदेशी विमानों के प्रदर्शन और सुखोई-30 एरोबैटिक्स ने भारत की बढ़ती क्षमताओं को उजागर किया।