शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:12 IST

Bhagavad Gita, Natyashastra, UNESCO Memory of the World Register: जगातील सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असे पंतप्रधान मोदींनी याचे वर्णन केले

Bhagavad Gita Natyashastra included in UNESCO Memory of the World Register: आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला व्यापक अर्थाने जागतिक मान्यता मिळाली आहे. श्रीमद् भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र या दोन्हीला आता युनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर'मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. भारताच्या संस्कृतीच्या वारशासाठी हे ऐतिहासिक क्षण आहेत. युनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर'मध्ये जगातील महत्त्वाच्या कलाकृतींची कागदोपत्री वारसास्थळांसह यादी असते. आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीच्या शिफारसीनुसार आणि कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने यातील कलाकृतींची निवड केली जाते. या यादीत श्रीमद् भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा समावेश झाल्याने भारताचे जागतिक महत्त्व आणि शाश्वत वैश्विक मूल्य सार्वजनिकरित्या मान्य झाले आहे.

मे २०२३ पर्यंत 'मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर'मध्ये एकूण ४९४ दस्तऐवजीकरण केलेल्या वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला होता. आता या दोन कलाकृतींच्या समावेशामुळे आतापर्यंत भारतातील एकूण १४ नोंदी या रजिस्टरमध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनीही याबाबत सर्व देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. "जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण! युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश होणे ही आपल्या कालातीत ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक ओळख आहे. गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतके संस्कृती आणि चेतना जोपासली आहे. त्यांतील दूरदृष्टी असलेले विचार जगाला कायम प्रेरणा देत राहतील," असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले.

भारताचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या दोन्ही कलाकृतींच्या समावेशाची माहिती दिली. 'केवळ साहित्यिक वारसाच नाही तर भारताच्या सौंदर्यशास्त्र आणि तत्वज्ञानाचा आधारस्तंभ' असे त्यांनी या दोन कलाकृतींचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, "हे दोन्ही ग्रंथ आपल्या विचार करण्याच्या, अनुभवण्याच्या, जगण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीला आकार देणारे आधारस्तंभ आहेत. या रजिस्टरमध्ये आता भारताच्या एकूण १४ नोंदी आहेत. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञानाचा आणि कलात्मक तेजाचा उत्सव आहे."

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय