शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

दहशतवादी मुलाचा मृतदेह न स्वीकारणा-या पित्याचा अभिमान- राजनाथ सिंह

By admin | Updated: March 9, 2017 16:19 IST

लखनऊ चकमकीत ठार झालेला दहशतवादी सैफुल्लाचा मृतदेह नाकारणा-या पित्याचा अभिमान वाटतो असं कौतुक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - लखनऊ चकमकीत ठार झालेला दहशतवादी सैफुल्लाचा मृतदेह नाकारणा-या पित्याचा अभिमान वाटतो असं कौतुक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. लोकसभेत लखनऊ चकमकीवर निवेदन देत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. चकमकीत ठार झालेल्या दहशतवादी सैफुल्लाचे वडिल सरताज मोहम्मद यांनी एका देशद्रोह्याचा मृतदेह मी स्विकारणार नाही असं सांगत मृतदेह स्विकारण्यास नकार दिला होता. त्यांच्या या निर्णयाचं राजनाथ सिंह यांनी लोकसभेत कौतुक करताना आम्हाला तुमचा अभिमान आहे असं म्हटलं आहे. 
 
त्या वडिलांसाठी मी सहानुभूती व्यक्त करतो, सदनमधील सर्वांचं माझ्याशी एकमत असेल अशी खात्री व्यक्त करतो. सरकरला अशा पित्याचा अभिमान वाटतो', असं राजनाथ सिंह बोलले आहेत. सरताज मोहम्मद यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून 'हा संदेश संपुर्ण देशासाठी असला पाहिजे. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला प्रतिष्ठित मंत्र्याकडून आदराची वागणूक मिळत असल्याचं सांगत त्यांनी आभार व्यक्त केले.
 
 
लखनऊत तब्बल 12 तास सुरु राहिलेच्या चकमकी सैफुल्ला ठार झाला आहे. कमांडोजनी त्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न करत आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला ठार करण्यात आल्यानंतर त्याच्याजवळून इसीसचा झेंडा आणि ट्रेन टाईमटेबल सापडलं. 
 
(लखनऊमधील दहशतवादी इसिसनेच प्रेरित- पोलीस)
 
दहशतवादी सैफुल्लाच्या वडिलांनी त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. आपल्या मुलाला देशद्रोही म्हणत एका देशद्रोह्याचा मृतदेह मी घेणार नाही असं बोलले. दुसरीकडे सैफुल्लाच्या नातेवाईकांना त्याच्याबद्दल कळल्यानंतर धक्काच बसला. मात्र दुसरीकडे अटक करण्यात आलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या पित्यांनी आपली मुलं निर्दोष असल्याचा दावा केला. 
 
सैफुल्लाचे वडील सरताज यांनी बुधवारी अंतिम संस्कार करण्यासाठी आपल्या मुलाचा मृतदेह घेण्यास नकार दिला. ते बोलले की, 'त्याने देशविरोधी काम केलं आहे. आम्ही त्याच्यावर नाराज असून अशा देशद्रोह्याचा मृतदेह अजिबात घेणार नाही'. त्यांनी सांगितलं की, 'कौटुंबिक भांडणानंतर सैफुल्ला घरातून निघून गेला होता, आणि  त्यानंतर परत आलाच नाही'. सरताज यांनी सांगितलं की, 'काहीच काम करत नसल्याने काही महिन्यांपुर्वी मी त्याला मारलं होतं, त्यानंतर तो घर सोडून पळून गेला होता. गेल्या महिन्यात फोन करुन त्याने आपण सौदीला चाललो असल्याचं सांगितलं होतं'.
 
सैफुल्ला चकमकीत ठार झाल्यापासून त्याच्या नातेवाईकांना त्याने दहशतवादाचा मार्ग स्विकारला होता यावर विश्वासच बसत नाही आहे. एका नातेवाईकाने सांगितलं की, 'प्रत्येकजण आश्चर्यचकित आहे. दिवसातून पाच वेळा तो नमाज पडत असे. त्याच्याबद्दल असा विचार आम्ही कधीच केला नव्हता'.