शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अभिमानास्पद! ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 13:37 IST

१६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहाराणीकडून हे पद वकिलांचं विशेष नैपुण्य पाहून प्रदान करण्यात येते.हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये ४३ व्या क्रमांकावर आहे.महाराणीने ११४ वकिलांना QC म्हणून नियुक्त केलं आहे.

नवी दिल्ली  - कुलभूषण जाधव प्रकरणात हरीश साळवे यांनी भारताची भक्कम बाजू मांडून पाकिस्तानला तोंडावर पाडलं होतं. तेच मराठमोळे हरीश साळवे आता परदेशात आपली अव्वल कामगिरी करून दाखवणार आहे. भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे क्वीन काऊंसिल (क्युसी - QC)  म्हणून काम पाहण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. १६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे.ब्रिटिश सरकारच्या माहितीनुसार, महाराणीने ११४ वकिलांना नियुक्त केलं आहे. याशिवाय १० वकिलांचा सन्मान करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले आहे. द हेग येथील कुलभूषण प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू भक्कमपणे मांडणारे मराठमोळे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली असल्याने भारतासाठी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने नव्या नियुक्त्यांसंदर्भातील यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठमोळ्या हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायालयांसाठी महाराणीचे सल्लागार (QC) म्हणून हरीश साळवे यांना नियुक्त करण्यात आली आहे. महाराणीकडून हे पद वकिलांचं विशेष नैपुण्य पाहून प्रदान करण्यात येते.

एकूण ११४ बॅरिस्टर्स आणि कायदेपंडितांची महाराणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती. ११४  पैकी ३० महिला, २२ बिगर ब्रिटन वंशांचे, २६ सल्लागार, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले, ४ सॉलिसिटर अ‍ॅडव्होकेट या पदासाठी जवळपास २५८ अर्ज आले होते, त्यातील ११४ जणांची नियुक्ती झाली. १६ मार्च रोजी शाही समारंभात या ११४ जणांची महाराणीच्या उपस्थितीत औपचारिक नियुक्ती केली जाईल.

कुलभूषणच्या खटल्यासाठी फक्त १ रुपया फी घेतली  देशातील सर्वात महागडे वकील म्हणून हरिश साळवेंची ओळख आहे. मात्र, कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्यासाठी त्यांनी फक्त एक रुपया फी घेतली. हरिश साळवे कोर्टात एकदा हजर राहण्यासाठी साडे चार ते पाच लाख रुपये घेतात असंही बोललं जातं. तर संपूर्ण दिवसासाठी त्यांची फी २५ ते ३०लाख रुपयांपर्यंत सांगितली जाते. दिल्लीतील भगवान दास रोडवरील व्हाईट हाऊसमध्ये हरिश साळवे यांचं कार्यालय आहे. तर ते ज्या घरात राहतात त्याची किंमत कोट्यवधी रुपये सांगितली जाते.वकिलीचे बाळकडू आजोबा, पणजोबांकडून मिळाले  हरीश साळवे यांना घरातूनच वकिलीचे बाळकडू मिळालं असं म्हणावं लागेल. कारण त्यांचे आजोबा पी. के. साळवे. ते प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. याशिवाय त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. हरीश साळवेंचे वडील वडील हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. १९९२ मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि १९९९ मध्ये त्यांना सॉलिसिटर जनरल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. वकिली करण्याआधी ते सीए झाले. मात्र, नंतर त्यावेळचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची पदवी मिळवली. वकील झाल्यापासून साळवेंनी अनेक मोठे खटले लढले आहेत. यात कुलभूषण जाधव, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद, बिल्किस बानो प्रकरण, व्होडाफोन आणि केंद्र सरकारव वाद अशा अनेक मोठ्या खटल्यांचा अनुभव साळवेंकडे आहे. हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये ४३ व्या क्रमांकावर आहे.

 

टॅग्स :advocateवकिलKulbhushan Jadhavकुलभूषण जाधवInternationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालय