शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Wrestler Protest: आम्ही सगळी पदके परत करणार! आंदोलनाला बसलेल्या पैलवानांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 12:09 IST

दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर गेल्या काही दिवसापासून पैलवानांचे भाजप खारसाद ब्रिजभूषण सिंह विरोधात आंदोलन सुरू आहे.

भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटुंनी आंदोनल सुरू केलं आहे. युनियनच्या अध्यक्षांना अटक करून राजीनामा द्यावा, या मागणीवर ठाम असलेल्या कुस्तीपटूंनी आता मोठी घोषणा केली आहे. सर्व पैलवानांनी पदक परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात सहभागी असलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांनी गुरुवारी सांगितले की, हे सर्व खेळाडू त्यांची पदके परत करतील. दिल्ली पोलिसांनी संघाचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असतानाच धरणावर बसलेल्या कुस्तीपटूंच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. आंदोलक पैलवानांचे म्हणणे आहे की, जेव्हा पोलिसांनी अध्यक्षाला अटक करून तुरुंगात टाकले तेव्हाच त्यांचे आंदोलन संपेल.

Video: धक्कादायक... महिला आयोगाच्या अध्यक्षांना पोलिसांनी हाता-पायाला धरुन उचललं

विनेश फोगट म्हणाल्या की, आपले करिअर पणाला लागले आहे. यावेळी आंदोलनात सहभागी कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, या प्रकरणात अटक होऊ शकते, आम्ही निघू,  आमचे लक्ष्य फक्त ब्रिजभूषण शरण सिंह आहे.

आंदोलनात असलेल्या पैलवानांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आम्ही अशा वागणुकीची अपेक्षा करत नाही. देशात महिलांना अशी वागणूक दिली जात असल्याची परिस्थिती आहे. असेच करायचे असेल तर पदक परत करू, असंही त्या म्हणाल्या. 

काल आंदोलनाचा आजचा बारावा दिवस होता विविध राजकीय पक्ष खेळाडूंना पाठिंबा दर्शवले. आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील मोर्चा काढला. पण, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने बजरंग पुनियाने संतप्त प्रतिक्रिया दिली. भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख पीटी उषा यांनीही आज आंदोलकांची भेट घेऊन बाजू समजून घेतली. त्यानंतर, मध्यरात्री उशिरा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल याही आंदोलनस्थळी पोहोचल्या होत्या. त्यावेळी, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. 

ऑलिपिंक खेळाडूंचा प्रश्न आता कुठे तरी मिटेल असे वाटत असताना दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री जंतर मंतरवर 'दंगल' घडवून आणल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी आंदोलककर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. पण आंदोलक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असून अटकेची मागणी करत आहेत. पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केल्यानंतर बजरंग पुनियाने ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. तर, दुसरीकडे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीdelhiदिल्ली