शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांची काळजी घेत आहेत स्वयंसेवी संस्था, रोजचे जेवण व अन्य सुविधा पुरविण्यासाठी गुरुद्वारांचाही पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 05:04 IST

Farmers Protest : सिंघू सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांना रोजचे जेवण पुरविण्यासाठी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून बसलेल्या हजारो शेतकरी आंदोलकांना रोजचे जेवण व अन्य सुविधा पुरविण्यासाठी गुरुद्वारा, तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. आंदोलकांचा कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा, याचीही काळजी घेण्यात येत आहे.सिंघू सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांना रोजचे जेवण पुरविण्यासाठी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे. जिथे आंदोलन सुरू आहे, तिथे एक व्यासपीठ उभारण्यात आले असून, त्याच्याच जवळ या समितीने भव्य तंबू बांधला आहे. तिथे आंदोलकांसाठी जेवण तयार होऊन त्याचे दररोज वाटप केले जाते. रात्री विश्रांतीकरिता स्त्री व पुरुषांसाठी दोन वेगवेगळे तंबू दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने आंदोलनस्थळी उभारले आहेत. यासाठी समितीला अनेकांकडून सढळ हस्ते देणग्याही मिळत आहेत.  आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसाठी बाबा काश्मीरसिंगजी भुरीवाले पंथाच्या संघटनेकडून लंगर चालविण्यात येत आहे. आंदोलकांसाठी एक वेळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण बनविण्यासाठी स्वयंसेवकांची दररोज पहाटेपासून लगबग सुरू असते. दररोज लागणाऱ्या वस्तूंचेही वाटप खालसा एड या संस्थेने आंदोलकांना टुथपेस्ट, साबण, ब्लँकेट अशा दररोज लागणाऱ्या गोष्टी पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या कार्याला पंजाबमधील तरणतारण येथील डेरा बाबा जगतारसिंग, तसेच अन्य संस्थांचेही पाठबळ लाभले आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप