शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल दरवाढीचा निषेध, तेजस्वी यादव यांनी सायकलवरून गाठलं विधानभवन

By महेश गलांडे | Updated: February 26, 2021 15:46 IST

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. या इंधन दरवाढीचा वेगवेगळ्या प्रकारातून निषेध करण्यात येत आहे. विरोधकांनीही यापूर्वी अनेकदा केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. या इंधन दरवाढीचा वेगवेगळ्या प्रकारातून निषेध करण्यात येत आहे. विरोधकांनीही यापूर्वी अनेकदा केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे.

मुंबई -  पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे, पुण्यातील वकिलांनी शुक्रवारी अनोख्या पद्धतीने निषेध केला. न्यायालयाच्या आवारात चक्क सायकल वारी करत सर्व वकील दाखल झाले. सरकारला वाढत्या महागाईची चिंता नसल्याचे सांगत आपणच उपाय शोधण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे वकिलांनी यावेळी सांगितले. तर, दुसरीकडे बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही सायकलवरुन विधानभवन गाठलं आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलने शतक पूर्ण केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. या इंधन दरवाढीचा वेगवेगळ्या प्रकारातून निषेध करण्यात येत आहे. विरोधकांनीही यापूर्वी अनेकदा केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. कुठे चुलीवर स्वयंपाक करुन तर कुठे दुचाकी वाहनाला फाशी देऊन अनोख्या पद्धतीने हा निषेध नोंदविण्यात आला आहे. आता, बिहारमधील राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी विधानसभेच्या अधिवेशन कामकाजाला जाण्यासाठी चक्क सायकलवरुन सवारी केली. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे आज सायकल चालवून आपण विधानसभा सभागृहात जात आहोत. गरिबांची पिळवणूक करणाऱ्या आणि धनदांडग्यांप्रती प्रिय असलेल्या सरकारने पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढवून सर्वसामान्य नागरिकांना मरायला भाग पाडलंय.  डबल इंजिनवाली सरकार, गरिबांना लुटून भांडवलदारांसाठी बँटींग करत आहे, असे ट्विट तेजस्वी यादव यांनी केलंय. या ट्विटसह त्यांनी फोटोही शेअर केले आहेत. त्यामध्ये, तेजस्वी यादव यांच्यापाठीमागे पोलीस आणि सुरक्षा जवान पळताना दिसून येत आहे. 

पुणे शहरात वकिलांची सायकल सवारी

पुणे शहरात पॉवर आणि स्पीड पेट्रोलचे भाव शंभरीपार पोहोचले आहेत. तर साध्या पेट्रोलसाठी लिटरमागे जवळपास ९७ रुपये मोजावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या वकिलांनी अनोखा निषेध केला. या वकिलांनी आत चक्क सायकलवरुन न्यायालय गाठले. काळा कोट घालत या वकिलांनी सायकल स्वारी केली. पुण्यातले प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी यात पुढाकार घेतला होता. 

टॅग्स :Petrolपेट्रोलTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारDieselडिझेलGovernmentसरकार